जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

वेब टीम जामखेड :  मागील वर्षभरापासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.१७ जानेवारी रोजी १८ जागासाठी निवडणूक होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणूकीत माजीमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आणि जगन्नाथ राळेभात पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी असे दोन पॅनल होण्याची अशी शक्यता आहे.

बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने गेली वर्षभरापासून प्रशासक कारभार पाहत आहेत. दरम्यान या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नेमणूक झाली आहे.

त्यांनी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून या यादीत दुरूस्ती किंवा हरकतींसाठी २२ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर आलेल्या हरकतींवर कार्यवाही नंतर दि. ६ डिसेंबर रोजी अंतीम मतदार यादी जाहीर करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments