कलावंत,तंत्रज्ञांच्या,प्रयोगशीलतेतून साकारलेले
'द ब्लॅन्कड इक्वेशन'
अमेरिकेच्या पर्ल हार्बरचा तळ उध्वस्त केल्यानंतर अमेरिकेने जपानशी युद्ध पुकारलेलं असतं . त्यामुळे आकाशात विमान उडायला लागली की जपानमध्ये नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरे घेण्यासाठी सायरन वाजवले जायचे. जपानमधल्या हिरोशिमा मध्ये हकुझो आणि जेतो हे दांपत्य राहत असते. त्यांच्याबरोबर त्यांची दोन नातवंडही राहत असतात. तिथे लष्करी अधिकारी येतात आणि तेजोला उद्या सकाळी नातवंडाना तयार ठेवा त्यांना सुरक्षित छावणीमध्ये न्यावयाचे असल्याचे सांगतात. जपानच्या राजेशाही बद्दलही तुमच्या मनात राग असणारच याची आम्हाला कल्पना आहे, असे म्हणतात. नाही असे नाही आमचा इतिहास आणि आमची परंपरा त्याला ते धरून होणार नाही असे जेतो सांगते. प्रदीर्घ काळ युद्ध चालल्यामुळे जपानी जनतेची मानसिकता बिघडण्याला कारणीभूत असते.
टोकियोमध्ये प्रयोगशाळेत डॉक्टर नशीना त्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली अणुबॉम्ब तयार करण्यासाठीचे संशोधन सुरू असते. तर अमेरिकेतल्या मॅनहटन मध्ये देखील ओपनहायमर नावाचा संशोधकाने अणुबॉम्बची निर्मिती केलेली असते. टोकिओमध्ये तातडीने अणुबॉम्ब तयार करा आपला अणुबॉम्ब का तयार होत नाही असे जपानच्या सैन्याकडून वारंवार विचारणा होत असते. तर डॉ. निशीना व त्यांचे तरुण सहकारी तुटपुंज आर्थिक बळावर अनुसंशोधन करत असतात. अमेरिकन सैन्याकडून हवाई हल्ले सुरूच असतात. याच दरम्यान डॉक्टर निशीनाच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली मसाको आणि तामिकी यांची प्रेमकथा फुलत असते. मसाका आपली आई जेतो हिला तामिकी बद्दल कळवते. आणि तुमच्या मनाविरुद्ध कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आईला सांगते. तामिकी आणि मसाका यांच्या भेटीदरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यात मसाकाचा मृत्यू होतो.
मॅनहटन मध्ये हिरोशिमा मध्ये बॉम्बस्फोटामुळे प्रचंड नरसंहाराने ओपनहायमर अत्यंत उद्विग्न मनस्थितीत पोहोचतो. ईतक्या प्रचंड संहारक शक्तीचा आपण शोध का लावला या विचाराने ओपनहायमरला मानसिक त्रास होत असतो. तर टोकियोमध्ये लष्कराच्या उपप्रमुख मिस कवाबे तिथल्या संशोधकांना आपण अणुबॉम्ब तयार करू शकत नाही का? असे विचारतात,आणि अमेरिकेला हे कसे साध्य झाले असे विचारतात. तेव्हा आपण पर्ल हार्बरचा हल्ला जसा केला तसेच अमेरिकेलाही हे साध्य झाले असे सांगतात. आणि लष्कराला युद्ध थांबवण्याची विनंती करतात. मात्र मिस कवाबे या जपानच्या इतिहासाला आणि सामुराईपरंपरेला हे शोभणारे नाही, आपण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू असे सांगतात .
मॅनहटन मध्ये ओपनहायमरची मानसिकता त्याला दुत्कारू लागते. आपण हे सगळं थांबवायला हवं असे म्हणून सध्या रशिया विरुद्ध युक्रेन, पॅलेस्टाईन विरुद्ध इसराइल, आणि इराण विरुद्ध ईराक यांच्यात वारंवार होणारे युद्धात केव्हाही अण्वस्त्र वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ही काळ वंडलेली समीकरणे सोडवायचा प्रयत्न करायला हवा असा संदेश देते. तिथेच नाटकाचा पडदा पडतो .
'द ब्लॅन्कड इक्वेशन 'हे चंद्रकांत चौधरी लिखित नाटक नगरच्या नाट्य आराधना या संस्थेने सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन तेजस अतीतकर यांनी केले. या नाटकात डॉ. निशिना व हकुझो यांच्या भूमिका तेजस अतितकर यांनी समर्थपणे पेलल्या.त्यांना ओपनहायमरच्या भूमिकेतील चैतन्य खानविलकर यांनी तोला मोलाची साथ दिली. अवंती गोले यांनी ऊर्जा व नतालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांवर योग्य तो प्रभाव पाडला. तर मिस कवाबे आणि जेतोच्या भूमिकेत तन्मयी भावे यांनी भूमिका अत्यंत संयमीत पणे पार पाडली. मसाकाच्या भूमिकेत तेजा पाठक अगदी सहजतेने वावरल्या. तामिकीच्या भूमिकेत देवदत्त चौसाळकर यांना मसाकोच्या प्रियकराची भूमिका चांगली निभावली तनाकाच्या भूमिकेत ओजस्वी पाठक आणि जिओच्या भूमिकेत पद्मनाभ जांभळे चपखल बसले. तर लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत सुजित भावे आणि राहुल रसाळ ठीक वाटले .
कथानकामध्ये 20 कलाकारांनी सादर केलेले माइमिंग ऍक्ट मधून जपानच्या नागरिकांची मानसिकता आणि महाभारतातील कृष्ण उपदेशाच्या प्रसंगाने नाटकाचे कथानक पुढे सरकले. शिवाय या प्रसंगांना विशेष उठावही मिळाला.या नृत्यांची कोरिओग्राफी संकेत खेडकर यांनी केली होती . नाटकाची प्रकाशयोजना विनेश लिमकर आणि सोहम डायमा यांनी पाहिली प्रकाश योजनेतून बॉम्बस्फोटासारखा प्रसंग ही त्यांनी प्रभावीपणे उभा केला . या नाटकाचे नेपथ्य समीर पाठक आणि अंकिता खानविलकर यांचे होते. त्यांनी हिरोशिमातील घर आणि मॅनहटन मधील लॅब आणि टोकियो मधील लॅब चांगली उभी केली होती. विशेषता बॉम्बस्फोटानंतर हिरोशिमात झालेली पडझड अत्यंत प्रभावीपणे साकारली. या नाटकाचे संगीत शिल्पा मेनसे आणि सारंग देशपांडे यांनी नाट्यसंहितेला पूरक असे दिले. प्रसाद सैदाने यांनी रंगभूषा आणि तेजा पाठक यांनी केलेली वेशभूषा नाटकाला साजेशी होती. एकूणच नाटक चालू असताना प्रकाशयोजनेच्या माध्यमातून नेपथ्याच्या आणि संगीताच्या माध्यमातून पडद्यावर घडणाऱ्या प्रसंगात विविध प्रयोग करण्यात आले. त्याचा कलाकारांनाही चांगला उपयोग झाला आणि तो प्रयोग प्रभावीपणे सादर करण्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यशस्वी झाले.
(देवीप्रसाद अय्यंगार )






0 Comments