'निर्वाण जंक्शन' चा सुखद नाट्यप्रवास
तिला जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो, ती स्टेशन मास्तर कडे जाते. तेव्हा काल प्रवाह एक्सप्रेस बारा वाजताच गेल्याचे ते सांगतात . त्या सकाळी रघु आणि बायजा तिथे येतात, आणि देवाला स्टेशन विषयी माहिती सांगू लागतात. बोलण्याच्या ओघात स्टेशन मास्तर तुला खायला काहीतरी देईल ते तू खाऊ नकोस असे बजावतात. हा स्टेशन मास्तर कित्येक वर्षांपूर्वीच रिटायर्ड झाला आहे. त्याच्याच कारकिर्दीत या स्टेशनवर रेल्वे रुळावरून घसरून मोठा अपघात झालेला होता. तेव्हा तिथे माणसाच्या रक्ता-मांसाचा झाला होता. तेव्हा स्टेशनमास्तर इथे नव्हता . त्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं रघु आणि बायजा रेवाला सांगतात. त्या मृतात्म्यांचे आत्मे येथे दिसतात असेही ते सांगतात. रेवाला ही त्या रात्री चा सर्व घटनाक्रम आठवतो मग रात्री आपल्याला कोणीच कसे दिसले नाही याचा विचार रेवा करू लागते . त्या रात्री तिच्या स्वप्नात रेवाचे बाबा येतात . आणि त्यांच्या मृत्यू बद्दलची घटनाही तिला कळते. त्या रात्री तिच्या बाबांनी तिला अनेकदा फोन केलेला असतो, मात्र कामाच्या व्यापक तिचे दुर्लक्ष झालेले असते. तसा तिच्या बाबांबद्दलचा रागही तिच्या मनात असतो. त्याबद्दल तिला पश्चाताप होत असतो की, आपण फोन उचलायला हवा होता. त्याच स्वप्नात रेवाला अमीना , कविता, चिन्मय, पक्या ,बाबुलाल आदी पात्रही भेटतात. यातील प्रत्येक जण आपापल्या अपेक्षा ,आकांक्षा ,कर्तव्यांचं आपण केलेल्या कर्माचे आणि फसवणुकींचे ओझे मनावर ठेवून वावरत असतात. आणि स्टेशन मास्तर आत्माराम मात्र त्या फलटावर येणाऱ्या प्रत्येकाच्या ओझ्यांची आणि साहित्याची एका रजिस्टर मध्ये नोंद करत असतो ज्या दिवशी ही सगळी पात्र आपल्या मनावरच्या ओझ्यांची दडपण टाकून देतील त्या दिवशी त्यांच्यासाठी काल प्रवाह एक्सप्रेस इथं निर्वाण स्टेशनवर थांबेल आणि हे सर्वजण प्रवासी म्हणून त्या गाडीत बसून निघून जातील. मग आपण पाहिलेले रात्रीचे स्वप्न होते की भास आणि रात्री आपण काढलेले फोटो आणि वहीत केलेल्या नोंदी काहीच कसे दिसत नाही असे रेवाला प्रश्न पडतात . आणि नकळतपणे आपल्या वडिलांनी केलेले फोन आपण उचलला नाही याबद्दलच्या पश्चातापाचे ओझ तिच्या मनावरून उतरू लागतं. इतक्यात काल प्रवाह एक्सप्रेस येते आणि ही सर्व पात्रता त्या गाडीतून निघून जातात. आणि रेवा स्टेशनच्या बाहेर पडू लागते तिचा जीवन प्रवास पुन्हा सुरू होतो.
निर्वाण जंक्शन हे नाटक संगमनेरच्या नाटकवाले सेवाभावी संस्थेने सादर केले माणसाने आयुष्यभर जगताना वाहिलेले अपेक्षा, आकांक्षा, कर्तव्य जबाबदाऱ्या,कर्म यांचे ओझे वाहिलेले असते. ते जेव्हा या सर्व ओझ्यातून मुक्त होतील तेव्हाच त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल , असे जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न या संहितेतून केला गेला. या संहितेचे लेखन व दिग्दर्शन डॉ. अमित शिंदे यांनी केले असून त्यांनीच स्टेशन मास्तर आत्माराम ची प्रमुख भूमिका साकारल्याने या भूमिकेला त्यांनी न्याय दिला. रेवाच्या भूमिकेत मंजुषा बेनके यांनी पत्रकाराची भूमिका उत्तम वठवली काही प्रसंगात त्यांची संवाद फेक लाऊड वाटत होती. रघु (प्रदीप बनकर) आणि बायजा ( रसिका रिठे )हे त्यांच्या भूमिकेत ठीक वाटले. रेवाचे बाबा (विकास खेडकर) आणि बाबुलालच्या भूमिकेत अभिजीत भंडारे यांनी संयमित भूमिका केल्या. अमिनाच्या भूमिकेत वैष्णवी भोईर, कविताच्या भूमिकेत वेदांती निकम, पक्याच्या भूमिकेत अर्षद तांबोळी ,चिन्मयच्या भूमिकेत आदित्य पाठक यांनी आपापल्या भूमिका अत्यंत जबाबदारीने साकारल्या चिन्मय ,पक्या आणि आमिना यांनी त्यांचे प्रसंग कथन करताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेणे प्रेक्षकही हेलावले.
या नाटकाचे नेपथ्य अंजना मोरे यांनी उत्तम साकारले . प्रकाश योजना सोहम दायमा यांनी केली. ती या नाटकाला साजेशी होती. संगीत संयोजन गार्गी अरगडे आणि भूमिका थिटे यांनी समर्थपणे पेलली. सोहम सैंदाणे यांची रंगभूषा आणि अमित कळमकर यांची वेशभूषा संहितेला साजेशी होती. एकूण निर्वाण जंक्शन चा नाट्यप्रवास प्रेक्षकांना सुखद वाटला. देवीप्रसाद अय्यंगार

0 Comments