राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले
उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यार्थ्याचे यश
नगर - उत्तराखंड येथील सीबीएसईने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये इयत्ता दहावीतील तनोज साई रेड्डी याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक मिळवत स्पर्धेत आपले स्थान टिकून ठेवले. तर मध्यप्रदेश मधील ग्वालियर या ठिकाणी झालेल्या एरोबिक्स स्पर्धेत इयत्ता सहावीतील जीत जखोटिया याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तर इयत्ता पाचवीतील अग्रता बाकली हीने तृतीय क्रमांक मिळवून कास्यपदक मिळवले. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या सर्व खेळाडूचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप ,उप प्राचार्य शगुप्ता काजी,आशितोष नामदेव यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन पठारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करताना शाळेचे प्राचार्य श्री. मंगेश जगताप सर म्हणाले, तुम्ही घेतलेली मेहनत, परिश्रम यामुळे तुमची स्वतःची तर राष्ट्रीय स्तरावर ओळख झालीच त्याबरोबर शाळेचे नावही तुम्ही उज्वल केले. असेच चांगला दर्जेदार खेळ खेळत रहा व यापुढेही या खेळामध्ये उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो. अशा शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments