महिला संघावर करोडोंचा रुपयांचा पाऊस

वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशाचा पाऊस  देणार इतके कोटी  


मुंबई: महिला विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपली तिजोरी उघडली आहे.  आयसीसी पेक्षा बीसीसीआयने६२ कोटी रुपयांची अधिक बक्षीसाची रक्कम भारतीय संघाला देण्याचे जाहीर केले  आहे. 

भारताने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकली त्यामुळे हा महिला क्रिकेटसाठी एक मोठा क्षण आहे . या ऐतिहासिक विजयाच्या सन्मानार्थ बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी भरीव बक्षीस रक्कम जाहीर केली ही प्रचंड रक्कम आयसीसी कडून विजेत्या संघाला मिळणाऱ्या जवळपास३९. ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे . 

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकीया  यांनी ही घोषणा करताना सांगितले की ज्याप्रमाणे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने क्रिकेटमध्ये नवा उत्साह आणला होता त्याचप्रमाणे हरमनप्रीत आणि तिच्या टीमने केवळ ट्रॉफीच  नाही तर आज प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे. 

या विजयाचे महत्त्व ओळखून बीसीसीआयने खेळाडू प्रशिक्षक आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ साठी ५१ कोटी रुपये रोख पुरस्कार जाहीर केला आहे.  पूर्वी बक्षीस रक्कम २. ८८ दशलक्ष डॉलर्स इतकी होती ती आता १४ दशलक्ष डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

यावेळी देवजीत  सैकीया  यांनी सांगितले की , खेळाडू प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ साठी संपूर्ण टीमला सन्मानित करण्यासाठी बीसीसीआयने ५१ कोटीचा खजिन उघडला आहे.  वेतन समानता लागू करणे असो किंवा बक्षिसाच्या रकमेत थेट ३00% वाढ करून ती १४ बिलियन डॉलर पर्यंत नेणे असो या सर्व निर्णयांनी महिला क्रिकेटला नेक्स्ट लेव्हलवर नेले आहे असे सैकिया  म्हणाले. 

फायनल सामन्यात भारतासाठी दीप्ती शर्मा (५८) धावा आणि प्लेयर ऑफ द मॅच ठरलेल्या शेफाली वर्मा (८७) धावा यांनी कमाल केली.  तर दीप्ती शर्माला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. 

दक्षिण आफ्रिकेचा ५२  धावांनी पराभव करत वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या महिला टीमने ऐतिहासिक कामगिरीसह आर्थिक पुरस्कारांचे बाबतीतही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

भारतीय महिला संघाने हा किताब जिंकून २००५ आणि २०१७ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे . वनडे आणि टी-२० अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये हा भारताचा पहिलाच विश्व किताब ठरला आहे. 


Post a Comment

0 Comments