"नट नावाचं नाटक" प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी

 "नट नावाचं नाटक" प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी

भाऊसाहेब वृद्धापकाळात आपलं आत्मचरित्र लिहितो . आयुष्यभरात त्यांना अजरामर केलेल्या अनेक पात्रांचा समावेश या आत्मचरित्रात केलेला असतो . त्याचे आत्मचरित्र वाचून त्याची दखल सर्वांनी घ्यावी असे त्याला मनोमन वाटत असते.  मात्र ,त्याचवेळी त्याचे मन त्याला निरनिराळे प्रश्न विचारून अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करत असते .  नट आणि नाटक या दोन वेगळ्या भूमिका असल्याने मात्र अनेकदा नट त्या भूमिका स्वतःपासून वेगळ्या करू शकत नाही अशा अशयावर बेतलेली डॉक्टर समीर मोरे यांचं नट नावाची नाटक ही संहिता नगरच्या रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानने सादर केली. 

भाऊसाहेबांनी साकारलेले सुधाकर, अथेल्लो , हॅम्लेट ही पात्रे त्याला पडदा पडल्यानंतरही कसं त्याच्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊन त्याला व्यसनी आणि वासनांध  बनवतात, याबाबत त्याचं मन त्याला सतत प्रश्न विचारत असते .  मात्र त्याच्या या आत्मचरित्रात त्याच्या शरीराच्या शामियानात वास केलेल्या भूमिका महत्त्वाच्या वाटतात आणि त्याची आई बायको आणि सोबतच्या इतर स्त्रीपात्रांनी फसवल्याची  भावना घर करून बसलेली असते.  त्यांना  मात्र या आत्मचरित्र स्थान नसतं मात्र त्याच मन त्याला या सर्वांशिवाय तुझा आत्मचरित्र पूर्ण होणार नाही आणि तू तुझ्या सहकलाकारां   सोबत कसा वागायचा  याच्या वर्णनाशिवाय आत्मचरित्र पूर्ण होणार नाही, असं सांगतं . त्याबरोबर त्यांन साकारलेल्या सुधाकर बरोबर सिंधू नसली तर सुधाकरच्या भूमिकेला अर्थ नाही तुझ्या आयुष्यात आई नसती तर तुझी भूमिका अर्धवट राहिली असती.  असे प्रत्येक पात्राचा असा प्रमाण उलगडा त्याचं मन  करत असतं.  तू जे सांगतोयस ते तुझ्या सोयीने सांगतो आहेस असं म्हणून त्याचं मन त्याला या सहपात्रांचा उल्लेख आत्मचरित्रात  केला पाहिजे असे सांगत. मात्र ते भाऊसाहेबाला मान्य नसतं म्हणून तो अखेर चाकू नये आत्महत्या करतो भाऊसाहेब कोसळतो तसं त्याचं मनही कोसळतं इथेच नाटकाचा पडदा पडतो. 

एका कलावंताच्या मनोवस्तेवर भेटलेल्या कथा नखाची संहिता डॉक्टर समीर  मोने यांची आहे.  संहितेतील  मानसिक गुंतागुंत प्राध्यापक रवींद्र काळे यांनी दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेतून व्यवस्थितपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.  त्यांना तितकीच मोलाची साथ माणूस या त्यांच्या मनोवस्तीतील भूमिकेतून रियाज पठाण यांनी दिली.  त्यांच्या आणि रवींद्र काळे यांच्या संवाद फेकीची जुगलबंदी प्रेक्षकांना विशेष भावली . तर सिंधू ,आई , राधिका  इतर भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री जोशी यांनी केलेली मेहनत त्यांच्या भूमिकांमधून दिसत होती. 

या नाटकाचे नेपथ्य दीपक अकोलकर यांनी अत्यंत जबाबदारीने पार पडलं गणेश लिमकर यांची प्रकाश योजना कथानकाला साजेशी  होती . नाटकाचे संगीत शितल देशमुख यांनी नाट्यसंहितेला पूरक असे दिले .  त्यातही प्राध्यापक आदेश चव्हाण यांच्या मृगनयना रसिक मोहिनी आणि मर्म बंधातली ठेव ही  या गाण्याच्या माध्यमातून कथानकाला पुढे नेले . नाटकाची रंगभूषा आणि वेशभूषा चंद्रकांत सैंदाणे आणि परवीन पठाण यांनी अगदी कमी वेळेत पात्रांच्या भूमिकेत झालेल्या बदलांना  प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले, राम पठारे यांचे नृत्यदिग्दर्शन  ही कथानकाला साजेस होत . एकूणच गुंतागुंतीची संहिता प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात रंगमूद्रा प्रतिष्ठानचे कलावंत यशस्वी झाले यात शंका नाही.

                                                                                     

                                                                                                                               देवीप्रसाद अय्यंगार 

Post a Comment

0 Comments