देहऱ्यात अखेर अपक्षच किंग मेकर

 देहऱ्यात अखेर अपक्षच किंग मेकर


वेब टीम नगर : आज दि ९ रोजी नगर तालुक्यातील ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला देहरे गावात चुरशीने झालेल्या निवडणूकीची चुणूक सरपंच निवडीत ही दिसून आली जनसेवा पॅनल च्या ७ जागा निवडून आल्याने निर्विवादपणे जनसेवा चा सरपंच व उपसरपंच होणार असे मानले जात असताना अचानक वर्चस्वाच्या राजकारणाने डोके वरती काढले ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान पंचायत समिती सदस्य व्ही डी काळे यांनी प्रयत्न सुरू केले यात बहुमतातील जनसेवा पॅनल चा एक महिला सदस्य गळाला लागला आणि सर्व समीकरण बदलले जनसेवा ६ लोकसेवा ६ व अपक्ष १अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली दोन्ही पॅनल कडून अपक्ष दिपक नाना जाधव यांना उपसरपंच पदाचा शब्द मिळत होता याच पार्श्वभूमीवर दोन्ही पॅनल ने आपापले सदस्य सहलीला पाठवले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी १०  वाजता सरपंच निवडणूक कार्यक्रम सुरू झाला यात सरपंच पदासाठी जनसेवा पॅनल कडून  हिराबाई अजित करंडे तर लोकसेवा पॅनल कडून रोहिणी नवनाथ करंडे तर उपसरपंच पदासाठी अपक्ष दीपक नाना जाधव व साजिद शेख यांचे अर्ज आले. प्रत्यक्ष मतदानावेळी अपक्ष दिपक जाधव यांनी जनसेवा उमेदवार सौ हिराबाई करंडे यांच्या पारड्यात मत टाकल्याने जनसेवा पॅनल चे सरपंच व अपक्ष दिपक जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाली आणि किंग मेकर अपक्ष उमेदवाराच्या निर्णायक मताने देहरे ग्रामपंचायत मध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य  व्ही डी काळे जि प उपाध्यक्ष  प्रताप पाटील शेळके गटाची सत्ता संपुष्टात येऊन सत्तापालट झाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघाचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

निंबळक गटात निधीची कमतरता न भासता गावातील सर्व प्रलंबीत कामे मार्गी लावली जाणार -माधवराव लामखडे

वेब टीम नगर - सबका योजना सबका विकास जीपीडीपी अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्या संबंधीचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात निमगाव वाघाचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माजी पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आदींसह अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

चास (ता. नगर) येथील साई लॉन येथे झालेल्या कार्यक्रमात निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली विजय जाधव, उपसरपंचपदी अलका भाऊसाहेब गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, प्रमोद जाधव, किरण जाधव, मुन्नाबी शेख, ज्ञानदेव कापसे, गोकुळ जाधव, डॉ.विजय जाधव, विजय शिंदे, किरण सांगळे गुरुजी यांच्यासह चास गणातील गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार झाला. रामदास भोर यांनी गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचे नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी निंबळक गटासाठी मोठ्या प्रमाणात निधी आनून विकासात्मक कार्ये मार्गी लावण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने निधीची कमतरता न भासता सर्व प्रलंबीत कामे मार्गी लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ना. जितेंद्र आव्हाड मंचची कार्यकारिणी जाहीर 

वेब टीम नगर :  ना. जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रमोदजी सरोदे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ना. जितेंद्रजी आव्हाड मंच प्रदेश  जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हा कार्याध्यक्ष अमोल शिंदे व महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई  भिंगारदिवे  यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे तालुका सरचिटणीस  सीताराम सकट तालुका अध्यक्ष श्रीकांत शिंदे   समता सैनिक दलाचे प्रमोद साठे   ग्रामपंचायत सदस्य मा विशाल भाउ पवार  ग्रामपंचायत सदस्य नंदू शिंदे साहेबराव शिंदे अजय शिंदे वैभव शिंदे मनोज गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. कार्यकारिणी पुढील प्रमाणे -महेशजी भोसले (जिल्हा सरचिटणीस), सुनीताताई धनवटे(जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी),अर्जुन नारायण वायभासे (जिल्हा उपाध्यक्ष), प्रतिभा ताई साळवे (पारनेर तालुका अध्यक्ष महिला आघाडी), पुनमताई मेहेत्रे (शहराध्यक्ष महिला आघाडी),श्रद्धा  संजय थोरात (नगर तालुका अध्यक्षा महिला आघाडी),विश्रांती बाबुराव पठारे (जिल्हा संघटक) , श्रावणी घनश्याम  भालेराव (जिल्हा उपसंघटक),नयन नामदेव खंदारे (शहर उपाध्यक्ष),भाऊसाहेब खाडे (शहर उपाध्यक्ष), माया प्रमोद नाळके (तालुका सचिव), मेहंमुदा पठाण (शहर उपाध्यक्षा),राणीताई ज्ञानेश्वर डहाळे (शहर सचिव),मिना घनश्याम भालेराव (तालुका सहसचिव), गीता अरुण कदम (तालुका उपाध्यक्षा),आकाश दयानंद देवकर(तालुका उपाध्यक्ष), प्रमोद सुखदेव माने (तालुका सरचिटणीस) सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दरेवाडी च्या सरपंचपदी भाजपा च्या स्वाती सुभाष बेरड तर ऊपसरपंचपदी  अनिल करांडे यांची निवड 


वेब टीम नगर : दरेवाडी ता नगर येथिल ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड व अनिल करांडे यांच्या नेतृत्वाखालील  भाजपा पुरस्कृत "ग्राम विकास पैनल " च्या  स्वाती सुभाष बेरड तर ऊपसरपंचपदी अनिल करांडे  यांची निवड झाली 

             बेरड कुटुंबिय  राष्ट्रीय स्वंयसेवक संध व भाजपा चे निष्ठावान म्हणुन पंचक्रोषित ओळखले जातात , रक्तदान चळवळीत, व समाजकारणात  मोठे योगदान या  परीवाराचे आहे,स्वाती सुभाष बेरड या प्रा भानुदास बेरड यांचे धाकटे भाऊ  सुभाष बेरड यांच्या पत्नी आहेत ,

               सुभाष बेरड यांनी -  गावातील ज्या मुलींचे विवाह होतात लग्नाच्या हळदिच्या दिवशी मुलीच्या वडीलांच्या दारी एक झाड (वृक्ष) लावले जाते व मुलगी समजुन त्या रोपट्याचे संगोपन वडीलांनी करावे अशी चळवळ सुरु केली आहे त्यास गावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे,शेजारी अनेक गावातील लोकानी ही कल्पना स्विकारली आहे,  त्या मुळे लोक चळवळीचे स्वरुप आले आहे 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments