इतिहासातील घटनांवर भाष्य करणारं नाटक 'उत्खनन'
एका कार्यकर्त्याला राजकारणी व्हायचे असते.पण राजकारणासाठी कन्टेन्ट हवे अश्या धारणेने तो एका संदर्भ गृहात येतो आणि त्या संदर्भगृहाच्या अधिकाऱ्याशी मी कार्यकर्ताअसून मला काही संदर्भ हवे आहेत, जेणेकरून मला त्यावर माझे राजकारण सुरु करता येईल. . तेव्हा तुमच्याकडे काही संदर्भ आहेत का असे विचारतो. तेव्हा झोपडपट्टी विकास, रस्ते , महागाई, अश्या मुद्द्यांवर त्यांची चर्चा सुरु होते. पण हे मुद्दे खूप गुळगुळीत झाले असून आता राजकारणासाठी नवीन मुद्दे आणायला हवेत, असे म्हंटल्यावर तो अधिकारी त्या कार्यकर्त्याला इतिहासाचे उत्खनन करावे लागेल, इतिहासाची मोडतोड करून मुद्दे मांडायचे आणि त्यावर राजकारण सुरु करायचे,ट्रेनिंग घेउन आयटी सेल सुरु करून लोकांमध्ये पसरवायचे ,असे म्हणून तो कार्यकर्ता इतिहासाचे संदर्भ असलेल्या ठिकाणी जातो आणि उत्खनन सुरु करतो.
या उत्खननात त्याला देशाच्या फाळणीचा इतिहास सापडतो. त्याच बरोबर गांधी हत्येचं कारणही सापडतं. त्यावर दोघांची चर्चा होते. तसा तो कार्यकर्ता पुन्हा उत्खननात मग्न होतो. मग त्याला आणीबाणी ची घटना कळते, त्याच बरोबर ऑपरेशन ब्लु स्टारचाही मुद्दा पुढे येतो. याच घटनेनंतर इंदिरा गांधींची हत्या होते. मात्र या वेळे पर्यंत देशाचं राजकारण काहीस बदलू लागतं. तोपर्यंत राजकारणात नवीन मुद्दे आलेले असतात. राम मंदिराचा प्रश्न पुढे येतो आणि एका पक्षाला आणि त्यांच्या मातृ संघटनेला कार सेवेने पछाडलेलं असतं एव्हाना कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रघात रूढ झालेला असतो. दरम्यान च्या काळात बाबरी मशिदीचे पतन होते देशामध्ये धार्मिक विद्वेषाचे राजकारण सुरु होते.
पुढे मुंबईत बॉम्बस्फोटाच्या घटना घडतात. हे सत्व उत्खनन चालू असतांना कार्यकर्त्याला घरून फोन येतो तसं तो अधिकाऱ्याला आपण पुन्हा केव्हा आणखीन उत्खनन करू मला माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पण पार पडायच्या आहेत तेव्हा तो अधिकारी अरे राजकारणात देश आणि देशाचे प्रश्न महत्वाचे , कौटुंबिक जबाबदाऱ्या दुय्यम असतात असे म्हणत राजकारण व नाटकात कन्टेन्ट महत्वाचा बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात असे सांगून इतिहास जपायचा असतो. उगाळायचा नसतो. देशात आजवर जेव्हढ्या महत्वाच्या घटना घडल्या त्यात अगदी जालियनवाला बागे पासून मुंबई बॉम्बस्फोतापर्यंत सगळी कडे सामान्य माणसांचीच फरपट झाली. राजकारणी ,इतिहासाची मोडतोड करून आपले मुद्दे लादत असतात पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं पण प्रत्येक गोष्टीत धर्म आणू नये इतिहासाची मोडतोड करून मुद्दे मांडण्यापेक्षा समाजातील सर्वांना एकत्र बांधणारा जातीय आणि धार्मिक सलोखा निर्माण करणारा देशातील तरुणांना त्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्या उज्वल भविष्याचं स्वप्न साकारणारा मुद्दा आणायला हवा असे म्हणून जोपर्यंत देशात राजकारण आहे तोपर्यंत या संदर्भ गृहाला मरण नाही असे सांगतो एव्हाना कार्यकर्त्याचंही राजकारणी बनण्याचं स्वप्न विरलेलं असतं अधीक्षकही कार्यकर्त्याला एक पुस्तक देतो आणि यातून इतिहासाच्या घटना मोडतोड न करता देशाच्या जनतेचं हिट सांभाळणाऱ्या गोष्टी पहा आणि त्याचे मुद्दे उभेकर असे सांगतो नाटकाचा पडदा पडतो.
६४व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धे मध्ये प्रवरा थिएटर्स आणि एफ के क्रिएटिव्ह क्रिएशन्स शेवगाव च्या संघाने उत्खनन हे नाटक सादर केलं. संहितेचा लेखन इरफान मुजावर यांचं होतं तर दिग्दर्शन प्रा.फिरोज काझी यांनी केलं. फिरोज काझी यांनीच संदर्भ गृहाच्या अधीक्षकांचे पात्र रंगविल्याने त्यांनी या भूमिकेला चांगलाच न्याय दिला तर कार्यकर्त्याच्या भूमिकेत प्रा.साजेद पटेल यांनी कार्यकर्त्याची भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पडली तर सामान्य माणसाची भूमिका दादा नवघरे यांनी समर्थपणे वठवली.नाटकात पायऱ्यांची लेव्हल आणि संदर्भ गृहाचे दरवाजे आणि घडलेल्या घटनांचे फुगे आणि संदर्भ ग्रंथ इतकेक्सह नेपथ्य असल्याने आणि नाटकात तिचं पात्र असल्याने त्यांच्या स्टेजवरचा वावर सुटसुटीत वाटत होता. या संदर्भ गृहाचे नेपथ्य डॉ. ओंकार रसाळ प्रा.अजित भालसिंग,प्रा डॉ सुरेश नजन, प्रा राहुल खरात आणि प्रा. रामचंद्र छडीदार यांच्या टीमने काही जुनाट वस्तू ,पुस्तकांचे रॅक, दोन चौकटी आणि एक टेबल आणि पायऱ्यांची लेव्हल, म.गांधीजी ,इंदिरा गांधी, डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरी याच्या माध्यमातून नेटक्या पद्धतीनं साकारले होते.या नाटकाची प्रकाश योजना प्रा वाल्मिक जाधव आणि विनोद राठोड यांनी चांगल्या पद्धतीने साकारली, नाटकाचे संगीत (प्रा. तुकाराम देवकर ,प्रा पांडुरंग शिनगारे ), रंगभूषा (प्रा केशव ससे ,प्रा मन्मथ क्षिरसागर ) आणि वेशभूषा (प्रा सुमित पुलाटे ,प्रा चैतन्य गंगावणे) नाटकाच्या संहितेला साजेशी होती .
नाटकात घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना परिचित असल्याने त्या दाखवतांना दिग्दर्शकाने कमालीचा संयम दाखवला त्यामुळे नाटकातील कोणतेही दृश्य अतिरंजित होईल असे दाखवणे दिगदर्शकाने कटाक्षाने टाळले. मात्र घटनेवर भाष्य करण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. एकूणच संयमित नाट्य प्रयोगाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
( देवीप्रसाद अय्यंगार )




0 Comments