पत्नीनेच केली होती पतीची हत्या

 पत्नीनेच केली होती पतीची हत्या 

वेब टीम नगर :  ८ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री १-३० वा.चे सुमारास  शेवगाव मधील शास्त्रीनगर  येथे रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना पिस्टलच्या दोन गोळया लागुन ते गंभीर जखमी होवुन मयत झाले होते.सदरबाबत शेवगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन मयताची पत्नी शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते हिचे विरुध्द दिनांक ३०/१२/२०१७ रोजी शेवगांव  पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.

यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी केला. बॅलेस्टिक एक्सपर्ट,न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई यांचेकडुन अभिप्राय प्राप्त करुन घेतला. त्यामध्ये सदर गुन्हयातील आरोपी शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते (मयताची पत्नी)हिचेविरुध्द पुरावा मिळुन आल्याने तिला सदर गुन्हयाचे कामी दिनांक २३/१२/२०२० रोजी १७.०५ वाजता अटक करण्यात आली. तिला न्यायालयाने दिनांक २८/१२/२०२० पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , अहमदनगर व सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सुदर्शन मुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव उपविभाग शेवगांव,पोहेकॉ.नितिन दराडे, पोना.संजय बडे,म.पो.कॉ. रोहिणी घरवाढवे करीत आहेत.


*

Post a Comment

0 Comments