बालरंगभूमी परिषदेतर्फे "जल्लोष लोककलेचा"

बालरंगभूमी परिषदेतर्फे "जल्लोष लोककलेचा"

 जिल्हास्तरीय नृत्य, गीतगायन व वाद्यवादन स्पर्धा

 अहिल्यानगर : लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी बालरंगभूमी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे. केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक असे स्वरुप न ठेवता ही लोकचळवळ व्हावी, लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत पोहचवितांना गायन, वादन, नृत्य क्षेत्रात ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन, लोककलेबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे "जल्लोष लोककलेचा" महोत्सव १६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला असून महोत्सवात लोकनृत्य (समूह/एकल), लोकगीत (समूह/एकल), लोकवाद्य (एकल) प्रकारांचा समावेश असेल. प्रत्येक कलाप्रकाराचे स्वतंत्र सादरीकरण अपेक्षित असून सादरीकरण कालमर्यादा समूह लोकनृत्य व समूह लोकगीतासाठी कमीतकमी ६ मिनिटे ते ८ मिनिटे तर एकल साठी ३ मिनिटे ते ५ मिनिटे कालमर्यादा असेल. समूह/सांघिक सादरीकरण करणाऱ्या संघात किमान ६ व जास्तीत जास्त १० बालकलाकार असणे आवश्यक आहे.या महोत्सवात वय वर्ष ६ ते १५ वर्षाच्या बालकांना सहभागी होता येईल असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रसाद भणगे यांनी सांगितले.

महोत्सवात शाळा, संस्था आणि मान्यताप्राप्त नृत्य/संगीत संस्था सहभागी होऊ शकतील, निर्धारित प्रवेश अर्ज भरून, संस्थेच्या लेटरहेड सोबत मुख्याध्यापक / संस्थाप्रमुख /संघप्रमुखांच्या सही शिक्क्यानिशी महोत्सवात प्रवेश घ्यावा लागेल.एकल कलाप्रकारासाठी रु.२००/- तर समूह कलाप्रकारासाठी रु.५००/- इतकी अनामत रक्कम जिल्हा शाखेच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे.जिल्हानिहाय आयोजित होणाऱ्या या महोत्सवात गतवर्षी राज्यातील ४० हजाराहून अधिक बालकांनी गायन, वादन व नृत्य या तिन्ही प्रकारात आपले कौशल्य दाखवत उत्तमरित्या सादरीकरण केले होते असे प्रतिपादन कोषाध्यक्ष श्रीमती.सोनाली दरेकर यांनी केले. 

सदर स्पर्धेचे म.ए.सो.चे रेणावीकर विद्यालय, अहिल्यानगर येथे आयोजन केले असून स्पर्धेच्या अधिक माहिती साठी सोनाली दरेकर: ७७२००००८३५ ,सागर अलचेट्टी : ९६३७१३९५५२ यांना संपर्क करून जिल्ह्यातील सर्व बालकलाकारांनी मोठ्या संख्येनी सहभागी होत स्मृतिचिह्न व रोख पारितोषिकांची लयलूट करून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन अहिल्यानगर शाखेतर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments