अनिल अंबानींवर ईडी ची मोठी कारवाई ७५०० ची संपत्ती जप्त

अनिल अंबानींवर ईडी ची मोठी कारवाई ७५०० कोटींची जप्ती 

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रिलायन्स अनिल अंबानी समूहाची ७,५०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं सोमवारी (३ नोव्हेंबर) दोन स्वतंत्र निवेदनं जारी करून ही माहिती दिली.

ईडीनं पीएमएलए २००२ च्या तरतुदीनुसार, रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या३,०८३कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ४२ हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ३० मालमत्ता, आधार प्रॉपर्टी कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या ५ मालमत्ता, मोहनबीर हायटेक बिल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या ४ मालमत्तांचा समावेश आहे.

याशिवाय गेम्सा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, विहान ४३ रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कुंजबिहारी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि कॅम्पियन प्रॉपर्टीज लिमिटेड यांची प्रत्येकी एक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

यामध्ये पाली हिल निवासस्थान, नवी दिल्लीतील महाराजा रणजितसिंग मार्ग येथील रिलायन्स सेंटर आणि दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरीमधील इतर मालमत्तांचा समावेश आहे.

ईडीनं म्हटलं आहे की, ही जप्ती आरकॉमच्या एसबीआय बँक फसवणूक प्रकरण, आरसीएएफएल आणि आरएचएफएलच्या येस बँक फसवणूक प्रकरणांशी संबंधित आहेत.

Post a Comment

0 Comments