नगर बुलेटीन

  नगर  बुलेटीन

श्रीराम मंदिर निर्माणनिमित्त रक्तदानातून सामाजिक संदेश

श्रीकांत जोशी : स्व.भाऊसाहेब सातपुते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबीर

वेब टीम  नगर : आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावे, ही तमाम भारतीयांची तर जगातील हिंदूची तीव्र इच्छा होती. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आल्यानंतर अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. त्यामधील काश्मिरचे कलम 370 रद्द करणे आणि श्रीराम जन्मभुमीत श्रीराम मंदिर होणे ही इच्छा आता पूर्ण होत आहे. तमाम हिंदूंसाठी ही अभिमानास्पद बाब असून, यासाठी मंदिर निर्माण होण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणार आहे. नगरमध्येही यादृष्टीने नियोजन सुरु आहे. आज श्रीराम मंदिर निर्माणनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्त केला जात आहे. अशाच उपक्रमातून अखंड भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी केले.

     स्व.भाऊसाहेब सातपुते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्यात येत असलेल्याच्या प्रित्यर्थ भुषणनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, तालुका संघचालक भरत निंबाळकर, महेंद्र चंदे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, विवेक नाईक, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, आयोजक भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी कुलगुरु सर्जेराव निमसे म्हणाले, आज रक्ताचा तुटवडा भासत आहे, अशा योग्यवेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन ट्रस्टच्यावतीने सामाजिक दायित्व जपले आहे. अशा उपक्रमातून एक सजग समाजाची निर्मिती होत असते. एकसंघ समाजातून देशाची अखंडता कायम राहते. श्रीराम मंदिर हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय होता, तो आता मार्गी लागत आहे. यानिमित्त होणारे उपक्रम हे जगाला दिशादर्शक ठरतील,  असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

     याप्रसंगी राजेंद्र सातपुते म्हणाले, स्व.भाऊसाहेब सातपुते चॅरिटेबल ट्रस्टची स्थापनाच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी करण्यात आली आहे. या माध्यमातून समाजाभिमुख कामे करण्यात येत आहेत. आयोध्यात श्रीराम मंदिर उभे राहत आहे ही ऐतिहासिक घटना असून, यानिमित्त रक्तदानासारखा उपक्रम राबवून कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रस्टच्या विविध उपक्रमासाठी सर्वांचे मोठे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर, महेंद्र गंधे आदिंनी मनोतातून श्रीराम मंदिर निर्माण व रक्तदान शिबीराचे कौतुक केले. याप्रसंगी अनुलोम संस्थेचे अनिल मोहिते, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश तवले, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, मयुर बोचुघोळ, ऋषीकेश आगरकर, अ‍ॅड.संतोष गायकवाड, मंगेश खंगले, निलेश लोढा, निलेश चिपाडे, बाळासाहेब पाटोळे, बाळासाहेब कोतकर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषीकेश आगरकर यांनी केले तर आभार अजित कोतकर यांनी मानले.

     या शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले. यावेळी ५५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको : बाळासाहेब सानप

वेब टीम  नगर : मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नये, अशी मागणी ओबीसीचे नेते व जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली.

      राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी,व्हीजे, एनटी जनमोर्चाच्यावतीने शनिवारी (दि.२६) नगर शहरात मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी संघटनेचे राज्य नेते सानप कालच्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित होते. नक्षत्र लॉन येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान फुलसौंदर होते.

     मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास ओबीसीचा विरोध नाही. पण, ओबीसीत त्यांचा समावेश नको असे सांगून सानप पुढे म्हणाले. असे झाल्यास ३८२ जातीचा समुह म्हणजे पूर्ण ओबीसी समाज कायमचा वंचित राहील. ओबीसीचे दुसरे नेते लक्ष्मण हाके यांनी सद्यस्थिती, सरकार निर्णय आणि ओबीसी समाजावरील अन्यायाचे सविस्तर विश्‍लेषण केले. एकूण लोकसंख्येत ओबीसी ५२टक्के संख्येने असून, आजही ते उपेक्षित आहे. त्यात मराठा समाजाचा समावेश होतो का? या भितीने ओबीसी आता जागा झाला आहे. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे.

     याप्रश्‍नी राज्यात नगरसह १५ ठिकाणी मेळावा आयोजित आहे. ओबीसीची एकजूट करण्यासाठी राज्यात आम्ही कार्यरत आहे. आजच्या नियोजनाच्या बैठकीला ओबीसीतील विविध  ५०-५५  जातेचे प्रतिनिधींचे उपस्थिती कौतुकास्पद आहे, असे राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले. तर नगर हे ओबीसीचे केंद्रबिंदू अशी ओळख उद्याच्या काळात निर्माण होईल, असेही ते म्हणाले. राज्याचे नेते वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ नव्याने उभी केली ती आरक्षण वाचविणे आणि समाजाचे १८-२०प्रलंबित असलेले ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे, त्यात आपण सहभागी झालो तरच हे शक्य आहे, असे प्रास्ताविकात रमेश सानप यांनी सांगितले.

     एम.पी.एस.सी. भरती तसेच या परिक्षेला स्थगिती दिली ती उठवावी या श्री.हाके यांच्या मुद्दयाला सहमती दर्शवत जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी या मुलांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास शिक्षणावरील केलेला खर्च तर वाया जाईल आणि भविष्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, हा ओबीसीवर अन्याय आहे, असे स्पष्ट केले.

     मुस्लिम समाजात सर्वसाधारणसह मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आदि आहेत. दक्षिण भारतात यानुसार ५ टक्के आरक्षण लागू आहे, असे राज्य ओबीसी शासन समिती सदस्य हाजी शौकतभाई तांबोळी यांनी सांगितले. समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने आरक्षणाचा अर्थ समजावून द्यावा लागेल, असे माजी नगरसेवक अशोक दहिफळे यांनी सांगितले. चर्मकार समाज संघटीत झाला तर तो राजकीय चित्र बदलू शकता. ओबीसीच्या सहकार्याने हेच कार्य पुढे नेले पाहिजे व समाजाला न्याय मिळावा ही भुमिका राज्य चर्मकार संघटनेचे संजय खामकर यांनी मांडली.

     प्रारंभी हरिभाऊ डोळसे यांनी स्वागत केले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राजेंद्र पडोळे, चंद्रकांत फुलारी, परवेझ शेख, सुवर्णकार संघटनेचे प्रकाश लोळगे, बारा बलुतेदार संघटनेचे माऊली गायकवाड, ट्रान्सपोर्ट संघटनेचे बाबा सानप, नगर सलून असो.चे अध्यक्ष अनिल निकम, नाभिक महिला अध्यक्षा सौ.वनिता बिडवे, गुरव समाजाच्या वनिता गुरव, वंजारी समाजाचे बंटी डापसे, गवळी समाजाचे मिसाळ सर, माळी समाजाचे बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदारचे कार्याध्यक्ष संजय सैंदर, सुवर्णकार संघटनेचे विशाल वालकर, निलेश पवळे, नईम शेख, अनिल इवळे, पत्रकार किरण बोरुडे, वंचित संघटनेचे प्रतिक बारसे, परेश लोखंडे, डॉ.श्रीकांत चेमटे, दीपक कावळे, श्रीपाद वाघमारे, शाम औटी, राजेंद्र भगत,  भाऊसाहेब घरवाढवे, वृत्तछााचित्रकार अमोल भांबरकर, संजय आव्हाड आदिंची समयोचित भाषणे झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मल्हार चौक येथील खंडोबा मंदिरातील चंपाषष्ठीचा सार्वजनिक उत्सव रद्द

    वेब टीम  नगर : स्टेशन रोड, मल्हार चौक येथील खंडोबा मंदिरच्यावतीने दरवर्षी विविध उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत असतात. परंतु यंदा रविवार दि. २० डिसेंबर २०२० रोजी चंपाषष्ठीनिमित्त सार्वजनिक स्वरुपात होणारा उत्सव रद्द करण्यात आला आहे. या दिवशी परंपरेनुसार कार्यक्रम मर्यादित स्वरुपात होणार आहेत, अशी माहिती राजेंद्र दारुणकर यांनी दिली.

     या विषयी माहिती देतांना दारुणकर म्हणाले, यावर्षी कोरोनामुळे अनेक महिने मंदिरे बंदी होती. आता ती उघडण्यात आली असून, नित्य नियमाची पूजा-आरती सुरु आहेत. यंदाच्यावर्षी चंपाषष्ठीनिमित्त मंदिराच्यावतीने फक्त आवश्यक ते कार्यक्रम होणार आहेत.  शासनाच्या नियमांचे पालन करत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहेत. तरी भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन यावेळी दारुणकर यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर जिल्हा माध्यमिक व  उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने

 जिल्हाभर काळ्या फिती लावून शासनाचा केला निषेध

   वेब टीम नगर - महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाच्या वतीने नवीन शिक्षकेतर आकृतीबंधाच्या विरोधात आज १८ डिसेंबर२०२० रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

     अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने शासनाने शालेय शिक्षण विभागाने दि. ११ डिसेंबर २०२० रोजी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. सदरचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक आहे. शासनाने नेमलेल्या आकृतीबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे त्यामुळेच शासनाचे या निर्णयाच्या विरोधामध्ये आज अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला.

     यावेळी अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व नाशिक विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित, जामखेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कोपनर डी. पी.,  शारदा शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष   पी.आर. गाडेकर, मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन,  उपमुख्याध्यापक पांडुरंग गोणे, पुणे पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, राज्य ग्रंथपाल विष्णू रंगा, शिक्षक परिषदेचे नेते चंद्रकांत चौगुले,  दिलीप रोकडे, शिक्षक भारती संघटनेचे सुनील गाडगे,  .आशा मगर तसेच प्रा .तानाजी काळुंगे , मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे,  सुषमा नगरकर,  भोरे जयमाला, विजय गरड, अनिता सरोदे, सुमन राऊत, रवि केळगंद्रे , सुर्यकांत रासकर, देशपांडे चंद्रशेखर,  लुहान लक्ष्मण आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाने मृत पावलेल्यांची माणुसकीच्या भावनेने अंत्यविधीचे कार्य केल्याबद्दल

स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान

वेब टीम नगर :  कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने कार्य केल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते कुर्‍हे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदि उपस्थित होते.

   कोरोनाच्या महामारीत शहरासह जिल्ह्यात मृत्यूदर वाढला असताना स्वप्निल कुर्‍हे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरधाम येथे कोरोना रुग्णांचे अंत्यविधी केले. काहींचे घरचे देखील येण्यास तयार नसताना त्यांनी माणुसकीच्या भावनेने अंत्यविधी करण्याचे कार्य केले. अनेक महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्यांनी हे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माळकूप, भाळवणी व ढवळपूरी येथील १३७ ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

३४ गरजूंची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

 फिनिक्स फाऊंडेशन, आनंद कुंदन पेट्रोल पंम्प व आनंदऋषीजी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

वेब टीम नगर :  फिनिक्स सोशल फाऊंडेशन, भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. नगर-कल्याण रोड, माळकूप (ता. पारनेर) येथील भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प येथे झालेल्या या शिबीराचा माळकूप, भाळवणी व ढवळपूरी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्ससह इतर नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले. यामध्ये१३७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ३४ गरजूंवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबीराचे उद्घाटन भारत पेट्रोलियमचे कॉर्पोरेशनचे अधिकारी भारत बढे यांच्या हस्ते झाले. यावेळी वितरक प्रकाश मुथा, माळकूपचे सरपंच बाळासाहेब शिंदे, उद्योजक संपत राहिंज, शिबीरचे आयोजक गौतम मुथा, फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदि प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

 प्रास्ताविकात गौतम मुथा म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महागाई व कोरोनाच्या संकटामुळे उदरनिरवाह करणे कठिण झाले असताना सर्वसामान्यांना खर्चिक आरोग्यसेवा परवडणारी राहिली नाही. ग्रामीण भागातील गरजूंना नेत्र शिबीराचा लाभ मिळण्यासाठी सामाजिक भावनेने या शिबीराचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात सुरु असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती देऊन नेत्रदान, अवयवदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.

भारत बढे म्हणाले की,  भारत पेट्रोलियम फक्त व्यवसाय न करता सामाजिक भावनेने देखील कार्य करीत आहे. दीन-दुबळ्यांसाठी आनंद कुंदन पेट्रोल पंम्पच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आले. टाळेबंदीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असून, होणारे आरोग्य शिबीर गरजूंना आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी एखाद्या पेट्रोल पंम्पाने सामाजिक भावनेने शिबीर घेणे हे पहिल्यांदाच पाहत आहे. व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड दिल्यास जीवनात सुख, समृध्दी निर्माण होते. वंचितांच्या सेवेतच ईश्‍वर सेवा असून, या भावनेने घेतलेले शिबीर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात नेत्र विज्ञानी संजय शिंदे, प्रशांत शिंदे, ओमकार वाघमारे, रामदास माने यांनी शिबीरार्थीची नेत्रतपासणी केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यस्तरीय कला उत्सवासाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींची सलग दुसर्‍या वर्षी निवड

शास्त्रीय गायनात ज्ञानेश्‍वरी पांढरे तर लोकनृत्यात पायल मुनोत जिल्ह्यात प्रथम

वेब टीम नगर : शिक्षण मंत्रालय आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच ऑनलाइन माध्यमातून जिल्हास्तरीय कला उत्सव संपन्न झाला. या कला उत्सवात शास्त्रीय गायनात इयत्ता दहावी मधील ज्ञानेश्‍वरी अविनाश पांढरे व लोक नृत्य प्रकारात पायल गणेश मुनोत या विद्यार्थिनींनी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकाविला आहे.

या दोन्ही विद्यार्थिनींची औरंगाबाद येथे होणार्‍या राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय कला उत्सवासाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींची सलग दुसर्‍या वर्षी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना विद्यालयाचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक दिलीप कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय पडोळे, रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आंदोलनाच्या दणक्यानंतर अखेर भिंगारला पाणी

मतीन सय्यद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनाला यश,भिंगार बंदचा निर्णय मागे

वेब टीम नगर : भिंगार शहरात अकरा दिवसापासून पाणी सुटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने भिंगार येथील नागरिकांसह बुधवारी (दि.१६डिसेंबर) छावणी परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत शुक्रवारी भिंगार शहरात नळाद्वारे पाणी सोडण्यात आले. पाण्याचा प्रश्‍न सुटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तर काही नागरिकांनी सोमवारी भिंगार बंदची हाक दिली होती. मात्र छावणी परिषदेच्या वतीने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यात आल्याने सोमवार व मंगळवारचे भिंगार बंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे शहर संघटक मतीन सय्यद यांनी दिली.

भिंगार शहरातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यात आलेला आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवस भिंगार बंद असल्याने व्यापार्‍यांचे नुकसान होणार होते. हे नुकसान होऊ नये यासाठी देखील हा बंद मागे घेण्यात आला आहे. भिंगारकरांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सातत्याने पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे सय्यद यांनी म्हंटले आहे.  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

शनिवारी हिंदी चित्रपट गीतांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम

   वेब टीम  नगर : येथील ‘जीवन संगीत’ या ग्रुपच्यावतीने शनिवार दि.१९ डिसेंबर २०२०रोजी ‘जिंदगी एक सफर है सुहाना..’ या किशोर कुमार से कुमार सानू तक हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रात्री ८. ३०  वा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होणार आहे. ‘शांती ऑडिओ लाईव्ह’ या सुप्रसिद्ध फेसबुक पेजवर हा कार्यक्रम सादर होणार आहे.

     या कार्यक्रमामध्ये गायक संदिप भुसे यांच्या समवेत पार्श्‍वगायिका संगीता भावसार या किशोर कुमार व कुमार सानू यांनी गायलेली गाणी सादर करणार आहेत. तरी सर्व संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन ‘जीवन संगीत’ ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.संदिप भुसे (मो.९८२२८७६१८) यांच्याशी संपर्क साधावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment

0 Comments