झुंजार पत्रकार रमेश जेठे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव : डाॅ.दत्ता विघावे

 झुंजार पत्रकार रमेश जेठे यांच्या

सामाजिक कार्याचा गौरव : डाॅ.दत्ता विघावे  


वेब टीम श्रीरामपूर : जागतिक संविधान व संसदीय संघ( WCPA) या स॔घटनेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपुर्ण व उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तींचे सन्मान व उचित गौरव दरवर्षी करण्यात येतो. या वर्षी देखील  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तीचे सन्मान व गौरव पुरस्कार देऊन करण्यात आले.रमेश जेठे हे झुंजार पञकार असून त्यांचे सामाजिक कार्य ही उल्लेखनीय आहे. त्यांनाही य वर्षी जौरविण्यात येत आहे. असे प्रतिपादन डॉ . दत्ता विधावे यांनी केले  डब्लू.सी.पी.ए च्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद येथे हा दिमागदार कार्यक्रम  संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. 

सामाजिक कार्यकर्ते  व  "शिर्डी एक्सप्रेस चे  संपादक रमेश जेठे यांनी कोरोना काळात लाॅकडाऊन मध्ये अनेक गोर-गरीब, संकटात सापडलेल्या पिडीत मजूरांना धान्य किट वाटले; मोठ्या शहरात मुंबई,पुणे.ठाणे,नाशिक या ठिकाणी अडकलेल्या व संपर्कात असलेल्या शेकडो मजूरांना अधिकारी व पदाधिकारी यांचेशी  संपर्क साधून गावी पाठविण्याची व्यवस्था केली, कोरोना (कोविड-19) ग्रस्त पेशन्टला स्वतः भेटून त्यांचे मनोबल वाढवले, अनेक पिडीतांचे खाजगी हाॅस्पिटल चे बील कमी करून दिले. बांधकाम क्षेत्रातील  मजूरांना,वृध्दांना शासकीय योजनांचे आर्थिक सहाय्य, रेशन कार्ड नसणाऱ्यांना रेशन मिळवून देण्यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करून धान्य मिळवून दिले, कोरोना पेशन्टला हाॅस्पिटल ला त्वरीत जाता यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग  (PWD) अधिकारी यांना भेटून रस्ते त्वरीत दुरूस्ती करण्यास भाग पाडले.

कोरोना हे देशावरील मोठे संकट असून सर्वांनी सर्व नियमांचे पालन करून पिडीतांचे संरक्षण करणे हे त्यांनी महत्वाचे समजले. त्याचप्रमाणे त्यांचे कार्य निस्वार्थपणे व अविरत चालू आहे. यामुळे जागतिक संविधान व संसदीय संघ( WCPA)च्या वतीने त्यांचा योग्य सन्मान होणे उचित ठरेल. या उद्देशाने रमेश जेठे यांना  वर्ल्ड पार्लमेन्ट कोरोना वॉरियर्स अवाॅर्ड 2020 चे "वर्ल्ड पार्लमेन्ट कोरोना वारीयर्स " पुरस्कार मिळाला. त्यामध्ये  प्रमाणपञ, पदक व स्मृती चिन्ह  देऊन श्रीरामपूर नगरपरिषद येथे म्हाडाचे अध्यक्ष ..शिवाजी राव ढवळे, राज्यमंञी दर्जा. WCPA  महाराष्ट्र (श्रीरामपूर चॅप्टर ) चे अध्यक्ष.

डाॅ.दत्ता विघावे, नगराध्यक्षा.अनुराधाताई आदिक, संपादक परिषद कार्याध्यक्ष  प्रकाश कुलथे, प्रांताधिकारी अनिल पवार , तहसीलदार प्रशांत पाटील यांचे शुभहस्ते रमेश जेठे यांना सन्मानित करण्यात आले. यामुळे त्यांचे सर्वञ  शुभेच्छांसह अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments