।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।

 ।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।। 

शक्ती आणि भक्तीच प्रतीक बुऱ्हाणनगरची तुळजा भवानी 


नगर पासून पाच किलोमीटर अंतरावर कापूरवाडीला  जाताना बुऱ्हाणनगरच्या देवीचे एक मंदिर दिसते ते तुळजाभवानी मंदिर त्या जवळ रस्त्यावर सर्व मंगल मांगल्ये  शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा श्लोक आपलं लक्ष वेधून घेतो.

दुसरा बुऱ्हाण निजामशहाच्या वेळची लोक कथा जानकोजी देवकर या गरीब भाविक तेल्याच्या  घरी देवीने अंबिकेच्या  रूपात आश्रय घेतला. तीच तारुण्य आणि लावण्य हे तिच्यासाठी शाप ठरले. बादशहाची वाईट नजर तिच्यावर पडली ती गर्जली पातशहा , काचेची तू अभिलाषा धरलिस तुझ्या नगरीत मी राहणार नाही तुझी हि पापी नागरी बेचिराख होईल असे म्हणून ती अंतर्धान पावली. त्याचं जागी बुऱ्हाणनगरमध्ये तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिर बांधलेले आहे सध्या आपणास दिसत असलेले मूळ मंदिर १९१३ मध्ये लहानू भिकाजी भगत यांनी बांधलं या  मंदिराचा २०१३ मध्ये शताब्दी महोत्सव साजरा करण्या आला. 

नवरात्रीच्या काळात तिसऱ्या माळेला येथे मोठी यात्रा भरते देवीची पालखी आणि पलंग तुळजापूर ला वाजत गाजत नेला जातो. ही परंपरा संत जनकोजी यांच्या पासून सुरु झाली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच तेलाचा घाणा आणि होमकुंड आहे.  अंधेरनगरी आणि एकनाथ नगर असं विविध नावानी ओळखलं जाणार हे ऐतिहासिक नगर हे शक्ती आणि भक्ती च विद्यापीठच वाटत.बुऱ्हाणनगर गर्भगिरी डोंगर रंगात निसर्गरम्य परिसरात वसले आहे हा परिसर अनेक मोठ्या मोठ्या प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक राजकीय आर्थिक घटनांचा मूक साक्षीदार आहे. त्यानं आक्रमणाच्या कटू घटनाही पाहिल्या  अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी च्या पदस्पर्शाने पुनीतही झाला आहे. 

नगर पासून जवळच असणारे बुरानगर हे तुळजाभवानी मातेचे माहेर तर तुळजापूर ते सासर समजलं जातं.  महाराष्ट्रातील पहिले ज्ञात राज्यकर्ते म्हणजे  सातवाहन. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण या सातवाहन राजघराण्यातील शेवटचा राजा शंभू राव  याला शत्रूच्या आक्रमणामुळे आपल्या राजधानीचा त्याग करावा लागला त्यावेळी त्यांना आपल्या राजघराण्यातील कुलदेवतेची मूर्ती आणि तीच सिंहासन घेऊन जवळ अंधेरीनगरी (बुऱ्हाणनगर) येथे आणून ठेवलं.  त्या काळात तेलंग नावाचा राजा राज्य करीत होता.तो पुढे कर्नाटकच्या स्वारीवर गेला असता आपल्याबरोबर ती मूर्ती घेऊन गेला ही मूर्ती सुरक्षेच्या कारणास्तव त्या वेळेस डोंगरचे चिंचपूर  (तुळजापूर) येथे ठेवली कर्नाटक च्या लढाईत तेलंग राजा कामी आला. पुढे बहामनी राजवटीत तुळजाभवानीची मूर्ती बुऱ्हाणनगर  येथे आणल्याचं भगत सांगतात. बुऱ्हाणनगर आणि तुळजापूर येथे ज्या ज्या वेळी आक्रमणं झाली त्यावेळी भवानीमातेच्या प्रवास बुऱ्हाणनगर ते तुळजापूर आणि तुळजापूर ते बुऱ्हाणनगर असा झाला याच तेलंग राजाचे थेट २१ व्या पिढीतील वंशज म्हणजे विजय अर्जुन देवकर भगत आहेत. भगत हे  बुऱ्हाणनगर च्या देवीचे वंशपरंपरागत पुजारी आहेत. 

त्यांची इथे साडेतीनशे एकर जमीन होती बहात्तर खणांचा मोठा वाडा होता या वाड्यात त्यांचे देवघर होते त्याचं रूपांतर विशाल तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करण्यात आले याबाबत अधिक माहिती सांगतांना भगत म्हणाले आमचे पूर्वज संत जानकोजी महाराज यांच्याकडे बालिकेच्या रूपात देवी बारा वर्षे राहिली ती स्वतः तेलाचा घाणा चालवायची.नंतर देविणारे जानकोजींच्या स्वप्नात दृष्टांत दिला.पलंग व पालखी घेऊन तुळजापुरला येत जा असं सांगितलं तेव्हा पासून जानकोजी पलंग व पालखी घेऊन तुळजापूरला जाऊ लागले ही प्रथा अजूनही चालू आहे. तुळजापुरला होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सवात मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.ती या पालखीतच आणि नंतर देवीला पलंगावर आसनस्थ केले जाते. 

बुरानगरला स्थानिक लोक बुर्‍हाणनगर या नावाने ओळखतात अहमदनगरच्या निजामशाही राजवटीतील दुसऱ्या  बुऱ्हाणशहा या राजाच्या नावावरून या गावाला  बुऱ्हाणाबाद किंवा बुरानगर हे नाव दिले १५९१ ते १५९५  यादरम्यान निजामशाहीचा सुलतान होता.  या कालावधीमध्ये त्यानं बुरानगर बसवलं असलं पाहिजे त्याबाबत निश्चित माहिती सापडत नाही. बुऱ्हाणनगरला  मध्ययुगीन काळात आर्थिक व्यापारी आणि धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झालेलं होतं. पूर्वी हा भाग आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि वैभवशाली होता त्यामुळे मोगलांनी १५९५ आणि १६०० ह्या दोन वेळा हे गाव लुटलं आणि जाळून उध्वस्त केली भगत हे आपल्या कुलदैवत असलेल्या तुळजापुरला जात असत.आपल्या वाड्यातच देवीची प्रतिष्ठापना केली घरात तेलाचा घाणा होता हा घाणा फिरवताना समोर देवीचे दर्शन  सतत घडत असे १९१३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर घडीव दगडातील पूर्वाभिमुख असून सुंदर मंदिर बांधण्यात आले त्याचा २०१३ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाली उत्सवाच्या प्रसंगी या मंदिराच्या जवळच दक्षिणेला स्वखर्चानं भव्य दक्षिणात्य पद्धतीचा प्रवेशद्वार बांधले  मंदिराशेजारी  दर्शन हॉलमध्ये दर्शन रांगेची व्यवस्था करता येते या हॉलमध्ये सप्तशृंगी माता आणि पूर्वजांचे फोटो लावण्यात आले आहेत.जानकोजी हॉल मधून प्रवेश करून आपण देवीच्या समोरील सभामंडपात पोहोचतो येथे मोठ्या काचेच्या लाकडी चौकटी तुळजाभवानी मातेने संत जानकोजी भगत देवकर यांना दर्शन दिलं तो प्रसंग पाहायला मिळतो. त्याअगोदरच्या चित्रात खरूज नायटे फोड फाटके कपडे अशा घाणेरड्या बालरुपातील अंबिका जानकोजीच्या घराच्या ओट्यावर बसलेली अंबिका दिसते तर दुसऱ्या चित्रात  बादशहाच्या सैनिकांना शाप देताना देवी अंबिका दिसते नंतर चे चित्र अंबिकेने परत एकदा दर्शन द्यावं म्हणून जानकोजी वेडापिसा होऊन तुळजापूर येथील विहिरीत उडी मारताना दिसतातआणि यावेळी तेथे माता प्रकट होताना दिसते या ठिकाणी तुळजापूर पालखी चे चित्र सर्व पहाताना आपण तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात दाखल होतो.या मंदिराच्या आतील तुळजाभवानी मातेची विलोभनीय आणि मनोहारी मूर्ती आपल्या मनात पूजनीय भाव  उत्पन्न करते. या मंदिरात ठिकठिकाणी चांदीचा वापर करून सुंदर कलाकुसरीच काम केलं आहे.इथे येताना ३ दरवाजातून प्रवेश करावा लागतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं लिहिलेलं दिसतं. दक्षिणेच्या प्रवेशद्वाराच्या समोरील वाड्याच्या उर्वरित भागात त्या मंदिराचे पुजारी राहतात पश्चिमेकडे तोंड केल्यास आपणास तीन शिखरे असणारी मंदिर दिसतात संतोषी माता,  सप्तशृंगी माता आणि वैष्णवी देवीची मंदिरे आहेत.  ही मंदिर बाबुराव रखमाजी पंगुडवाले आणि उमाबाई बाबुराव यांच्या स्मरणार्थ १९९५ मध्ये बांधण्यात आली.तेथून आपण मंदिराच्या उजव्या बाजूला आलो असता दोन भव्य दिपमाळा आपल्या नजरेस पडतात याशिवाय गावात विठ्ठलाचे जुने मंदिर, पावन गणपती, श्रीराम मंदिर आहे बुऱ्हाणनगर मध्ये निजामशाही राजवटी मधील तुरळक पाऊलखुणा दृष्टीस पडतात त्यापैकी एक म्हणजे गावाच्या उत्तरकडे मिरावली  पहाडाकडे  जाताना रस्त्याच्या कडेला बुऱ्हाणनगर बादशाच्या काळातील एक ऐतिहासिक बारव दिसते या बारवात एक शिलालेख कोरलेला आहे.  हा बारव  चिरेबंदी दगडांनी बांधलेला दिसतो उतरण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था करण्यात आली असून पूर्वी ही बारव घरच्या पाणीपुरवठ्याचे एकमेव साधन होती बुऱ्हाणनगर  अलीकडे एकनाथ नगर  या नावाने ओळखले जाते याचं कारण म्हणजे पाचव्या मराठा लाईट इन्फेन्ट्रीतील नाईक एकनाथ कर्डिले यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पूर्व आघाडीवर अत्युच्च शौर्य गाजवत या युद्धात धारातीर्थी पडले वीरता व अत्युच्च पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना ना वीरचक्र बहाल केलं त्यांच्या या तसा या गावाला सार्थ अभिमान आहे त्यांची आठवण कायम राहावी व येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना राष्ट्रप्रेम आणि देशसेवा याची म्हणून या गावात एकनाथ नगर असेही म्हटले जाते. 

बुऱ्हाणमागच्या देवीची तिसऱ्या माळेला भव्य यात्रा भरते त्यात देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढली जाते.

तुळजापूरच्या देवीचे माहेर जेलरोड ची देवी

जेलरोडची देवी या मंदिराला तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते कारण यात तुळजाभवानीला निद्रेसाठी जो मानाचा पलंग जातो तो पलंग प्रत्यक्ष याच मंदिरांमधून नेला जातो.

या पलंगाचा इतिहास थोडक्यात साधारण राजाराम देवराव यांच्या म्हणजेच सुमारे आठशे वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आजही मोठ्या भक्तिभावाने चालू आहे हा देवीचा पलंग साधारण गोकुळाष्टमीला घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे तयार होतो त्यानंतर आपलं ऋषिपंचमीला तेथून निघून जुन्नर आळेफाटा मार्गे नगर ला घटस्थापनेच्या दिवशी आणला जातो येथे आल्यानंतर पण जास्त धुमधडाक्यात फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले जाते त्यानंतर हा पलंग जेलदेवी या मंदिरात दर्शनासाठी ठेवला जातो.

दुसऱ्या माळेला दुपारी बारा वाजता पलंग येथून निघून भिंगार येथे तिसऱ्या माळेला पलंग पालखीची भेट होऊन कडा आष्टी जामखेड मार्गी विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमिला तुळजापूरला पायी मार्गक्रमण करून दिला जातो तेथे गेल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पलंगाची विधिवत पूजा आरती केली जाते व त्यानंतर रात्री ठीक बारा वाजता गावातून छबिना मिरवणूक निघते पहाटे चार वाजता मंदिरात प्रवेश केला जातो पहाटे देवीचे सीमोल्लंघन घेऊन देवी गाभाऱ्यामध्ये पलंगावर दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत (करंजी पौर्णिमा) निद्रा घेते पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देवी पलंगावरून उठून पुन्हा एकदा सिंहासनावर जाते व पलंगाची होमात आहुती दिली जाते.याचे मुख्य मानकरी आणि पलंगे कुटुंबीयांनी ही प्रथा अजूनही चालू ठेवलेली आहे.

तथापि यावर्षी सद्यस्थितीमध्ये covid-19 कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या वर्षी आम्ही पलंग डोक्यावर घेऊन पायी  मार्गक्रमण करण्याचे रद्द केले असून श्री पलंगे यांचे अहमदनगर शहर येथील श्री तुळजाभवानी सबजेल चौक ते तुळजापूर थेट वाहनाने जाण्याचे नियोजन केले आहे,अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अनंत बाबुराव पलंगे यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments