मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 


वृक्षासन 

भूमिका:  वृक्षाची अवस्था कायम उभी असते व त्याची प्रगती ही वरच्या दिशेने होत असतील तसेच काही प्रक्रिया या आसनात होत असल्याने याला वृक्षासन असे म्हटले आहे या दोन साधारण याशिवाय वृक्ष हे असं अधिक सामने शोधण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही अर्थात वृक्षाची स्थिरता इतर असं प्रमाणे याही आसनात  अपेक्षित आहे हे वेगळे सांगण्याची जरुरी नाही रग  लागलेल्या शरीराला आपण आळोखेपिळोखे देताना ताणतो तसा काहीसा परिणाम या आसनाचा अभिप्रेत आहे मात्र शास्त्रीय पद्धतीवर आधारित आहे.

क्रिया 

आसनस्थिती घेणे पूर्वस्थिती 

१)दंड स्थिती  श्‍वास सोडा व श्‍वास घेत घेत दोन्ही हात बाजूने वर नेऊन तळवे नमस्कार केल्याप्रमाणे जोडून 

डोक्याचे वर सरळ ठेवा.

 २) टाचा उचलून उभे रहा शरीर वर ताणून घ्या आणि श्वसन संथपणे चालू ठेवा.

आसनस्थिती सोडणे

१) श्वास घ्या श्वास सोडत सोडत  दोन्ही हात बाजूने खाली आणा टाचा उचललेल्या ठेवा. 

२)टाचा खाली आणून दंड स्थितीत  या.

आसनस्थिती 

 पाय स्थिर ठेवून आपले शरीर वरून  कोणीतरी ओढतआहे, अशी कल्पना करून त्याप्रमाणे ताण स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित परिणाम अनुभवायला मिळेल . आसन स्थिती घेतल्यावर श्वसन संथपणे चालू ठेवा . दृष्टी आणि मन स्थिर ठेवा  इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केलातर तोल जाण्याची शक्यता आहे. 

कालावधी

 हे आसन तोलात्मक असल्याने एक मिनिट पर्यंत स्थिर ठेवता आले तरी पुरे काही विशिष्ट परिणाम साधायचा असेल तर हा कालावधी तीन मिनिटं पर्यंत वाढवला तरी चालेल. 

 विशेष दक्षता 

हे आसन  सोपे असल्याने त्यात विशेष लक्ष घालण्याची सूचना नाही मात्र शरीर वर ताणत  असताना तोल  जाऊ न देण्याची काळजी लक्षपूर्वक घेतली पाहिजे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार (पौष्टिक लाडू) 
तिळगुळाचे लाडू 

साहित्य : २ वाट्या खमंग भाजलेले तीळ. १ वाटी खमंग भाजून - सोलून दाणे,पाव वाटी डाळ्या,सुक्या खोबऱ्याचे काप,१ वाटी चिक्कीचा गूळ, १ मोठा चमचा  साजूक तूप. 

कृती : तीळ, सोलून तुकडे केलेले शेंगदाणे, डाळ्या व खोबरे एकत्र करून घ्यावेत. 

चिक्कीच्या गुळात तूप घालून मंद आचेवर पाक करायला ठेवावा.गूळ विरघळला कि पाकातून बुडबुडे येऊ लागतील. झाऱ्यातून पाक वर केला तर पाकच्या धारेतून धागे निघू लागतील. 

गॅस बंद करून पाकात तीळ दाण्याचे मिश्रण घालून सर्व चांगले एक जीवकरावे. ताटाला थोडा तुपाचा हात लावून वरील मिश्रणाचे गारं असतांनाच छोटे छोटे लाडू वळावेत. तयार लाडू तूप लावलेल्या ताटात टाकला की खणकन वाजला पाहिजे. 

टीप : चिक्कीच्या गुळाचा पाक अगदी मंद आचेवर करावा, नाहीतर गुळ विरघळण्यापूर्वी पाक जाळून लाडू काळे व करतात होतात. 

लाडू चिवट होता कामा नये. खातांना लाडूचा तुकडा पडला पाहिजे.           Post a Comment

0 Comments