बनावट डिझेल प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

 बनावट डिझेल प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद 

वेब टीम नगर -गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या बनावट डिझेल प्रकरणात पो.उपाधीक्षक संदीप मिटके यांचा पथकाकडे  काल रात्री डिझेल रॅकेट संबंधी मुख्य सूत्रधार असलेल्या शब्बीर देशमुख आणि त्यांचा मुलगा मुद्दसर देशमुख या दोघांनी आत्मसमर्पण केले राहता तालुक्यातील लोणी परिसरात या दोघांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. आज सकाळी या दोघाना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. 

मंगळवारीच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपस वर्ग केला होता. शहरातील जी.पी.ओ चौकात तत्कालीन पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकानी  बनावट डिझेल जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे हे तपास करीत होते.मात्र गुन्हा नोंदवल्यानंतर १५ दिवसानंतर फारशी प्रगती झाली नाही. संदीप मिटके यांच्या पथकाकडे तपास दिल्यानंतर डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुद्दसर असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याची व्याप्ती अजूनही वाढणार असून आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. हे डिझेल कोठून आणले जात होते आणि जिल्ह्यात कोठे कोठे वितरित होत होते याचाही छडा आता लागणार आहे.दरम्यान न्यायालयाने त्या दोघांना १४ तारखे पर्यंत पोलीस कोठी दिली आहे.  



Post a Comment

0 Comments