संजुबाबा करणार राजकारणात प्रवेश; 'या' पक्षात जाण्याची शक्यता


वेब टीम : मुंबई
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.

पक्षाच्या वर्धापनदिनीच त्यांचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, असंही जानकर यांनी सांगितलं. त्यातच संजय दत्तने रासपला शुभेच्छा देणारा व्हिडिओ प्रसारित केल्याने तो रासपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जानकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं.

या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या मेळाव्यात बोलताना जानकर यांनी संजय दत्त येत्या २५ सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला.

अभिनेता संजय दत्तने रासपच्या वर्धापन दिनानिमित्त एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

जानकर हे माझ्या भावासारखे असून त्यांना मी शुभेच्छा देतो. मी इथे असतो तर नक्कीच त्यांच्या मेळाव्याला आलो असतो, असेही त्याने म्हणले आहे.

Post a Comment

0 Comments