दुर्गराज रायगड येथे दि.6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा
ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातून प्रतिसाद, अहिल्यानगर जिल्ह्यातील मावळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्या नगर : दुर्गराज रायगड, 6 व 7 जून 2025 - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राज्याभिषेक सोहळा समितीच्या संयोजनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे यांनी दिली.
या सोहळ्याच्या निमित्ताने ‘धार तलवारची, युद्धकला महाराजांची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीत, स्वराज्याच्या ऐश्वर्यात’ यासारख्या विशेष कार्यक्रमांची सादरीकरणे होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण पुन्हा उभा राहणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन घडणार आहे.
या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज व युवराजकुमार शाहाजीरेज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे ठळक आकर्षण :- ऐतिहासिक मिरवणुका आणि पालखी सोहळा, विविध सांस्कृतिक आणि शाहिरी कार्यक्रम, शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातील आणि देशभरातील शिवप्रेमींचा मोठा सहभाग, या सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाची तयारी जोमात सुरू आहे.
गुरुवार दि.5 जून 2025 दु.3.30 वा.राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करुन शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ (जिजाऊ समाधी स्थळ, पाचाड), दु.4 वा. युवराज संभाजी महाराज व युवराजकुमार शहजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ (स्थळ : नाणे दरवाजा), दु.4.15 वा. गडपूजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत, (स्थळ : नगारखाना) दुपारी 04.30 वा. - युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ’धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची... युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ (स्थळः होळीचा माळ), सायं. 07.00 वा. ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदंगाचा गजर. (स्थळः होळीथा माळ), रात्री 08.00 वा. - जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा... (स्थळः राजसदर), रात्री 01.00 वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ (स्थळः शिरकाई मंदिर), रात्री 09.30 वा. - वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन (स्थळःजगदीश्वर मंदिर),
शुक्रवार, दि. 6 जून 2025 सकाळी 07.00 वा. - युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते पारंपारिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण (स्थळः नगारखाना), सकाळी 07.30 वा. शाहिरी कार्यक्रम (स्थळः राजसदर), सकाळी 09.30 वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, सकाळी 09.50 वा. - युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन, सकाळी 10.00 वा. - युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक, सकाळी 10.20 वा. - श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक, सकाळी 10.30 वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन, सकाळी 11.00 वा. ’सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ पालखी सोहळ्यास प्रारंभ, दुपारी 12.00 वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन, दुपारी 12:15 वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान (स्थळः जगदीश्वर मंदिर), दुपारी 12.25 वा. - श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन.... असे कार्यक्रम होतील. तरी या ऐतिहासिक सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील मावळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे यांनी केले आहे.
0 Comments