अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला ६९ लाख रुपये नफा

 


अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला ६९ लाख रुपये नफा

 सभासदांना ११% टक्के डिव्हिडंट वाटपाला मंजुरी - विकास गीते

पतसंस्थेची ११३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

अहिल्यानगर : महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ११३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विकास गीते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. पतसंस्थेला चालू वर्षी ६९ लाख रुपये नफा झाला असून सभासदांना ११% टक्के डिव्हिडंट वाटपाला मंजुरी देण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे पतसंस्था यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन चेअरमन विकास गीते यांनी केले.

          अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ११३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन विकास गीते समवेत व्हाईस चेअरमन उषाताई वैराळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, संचालक सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, संचलिक प्रमिलाताई पवार, कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी, संतोष गवळी आदी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल म्हणाले की, पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या अडी-अडचणीच्या काळात नेहमी उभे राहण्याचे काम केले आहे. सभासदांच्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्न समारंभ यासाठी आर्थिक कर्जरूपी मदत केली आहे. तसेच सभासदाच्या आजारपणाचे तातडीने निदान व्हावे यासाठी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते यावर्षी १ लाख २५ हजार रुपयाची मदत झाली आहे. तसेच ९ मयत सभासदांचे कर्ज निवारण निधीतून कर्जरूपी ८ लाख ८ हजार २०० रुपये माफ केले आहे. याचबरोबर सभासद निर्वाण निधीतून १० मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी १० हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे, असे ते म्हणाले.

        कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी म्हणाले की, सभासदांना तातडीचे कर्ज ३० हजार रुपया वरून ४० हजार करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे पतसंस्थेवर कॅश क्रेडिट कर्ज १७ कोटी रुपये होते, ते फेडून आपली पतसंस्था स्व- भांडवली झाली आहे. यावेळी विषय पत्रिकेचे वाचन केले असून सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली असल्याचे ते म्हणाले.

पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी चांगला कारभार केला असल्यामुळेच पतसंस्थेला चांगले दिवस आले आहे. याच संचालक मंडळाला कायम मुदतवाढ मिळावी कारण, ते चांगले काम करत असल्याचे सभासदांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी किशोर कानडे यांचे चिरंजीव अभिषेक कानडे यांनी अमेरिकेतील क्लीव्हलॅन्ड स्टेट युनिवर्सिटी या नामवंत विद्यापीठामधून 'मास्टर ऑफ सायन्स इन केमिकल इंजिनियरींग' ही पदवी संपादन केल्या बद्दल पतसंस्थेच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन उषाताई वैराळ यांनी सभासदांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments