दीपावली वार्षिक राशिभविष्य

  दीपावली वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष शास्त्राच्या मदतीने भविष्य बदलता येत नाही पण एक संकेत मार्गदर्शन मिळते भविष्यात आतील लाभ अधिक मिळतो आणि हानी नुकसान कमी होण्यास मदत होऊन सुख समाधान आरोग्य मिळवता येते ज्योतिष शास्त्रास मर्यादा असतात नवग्रह २७ नक्षत्र बारा राशी नुसार ग्रहमानाचा हा अभ्यास फार प्राचीन ऋषीमुनींनी कडून प्राचीन ग्रंथांद्वारे संशोधनाद्वारे होत आहे त्या ग्रंथांना गुरु मानून हे यावर्षीचे राशिभविष्य देत आहे. 

ज्योतिषी - चिंतामणी देशपांडे 

 मेष : असंभव ते संभव  होईल

यंदा दिवाळीनंतर प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसून येणार आहे प्रवास आणि वाहन दुरुस्ती खर्च नाहक प्रवासातून त्रास होऊ शकतो. घरात कुटुंबात शुभकार्य मार्गी लागतील नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये शुभकार्य निमित्ताने खरेदी होऊन उत्साह वाढेल.अश्या वातावरणामुळे आनंद मिळवता येईल हातातून धार्मिक कार्यक्रम होतील.  त्यामुळे अध्यात्मिक आनंद मिळवता येईल मनातील विचारांमध्ये बदल यंदाच्या दिवाळीनंतर होणार आहे. व्यवसाय नोकरीत बदल करावाच लागेल जेष्ठांबरोबर वाद-विवाद करून चालणार नाही.मनोमन बद्दल स्वीकारावा लागेल कर्ज प्रकरण सहज करता येईल त्यामुळे उद्योग व्यवसायात सुधारणा करता येईल. एकूण २०२१ साल प्रगतीचे आहे उद्योगात पत वाढेल नोकरीतील अपेक्षा पूर्ण होतील नवीन ओळखी होऊन मित्र-मैत्रिणी भेटून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. 

उपासना : 

या वर्षीचा विचार करता या वर्षी गणेश उपासना अवश्य करावी त्याचबरोबर कुळधर्म कुळाचार सांभाळावा शनि मारुती उपासना आवश्यक करावी होतकरू अपंग व्यक्तीस लाल रंगाचे पदार्थ दान करावेत. 

वृषभ :सर्वतोपरी सफलता, शत्रुत्व

हे वर्ष दिवाळीनंतर मागील वर्षापेक्षा चांगले जाणार आहे.  पूर्वी केलेल्या कामातून आनंद देणार्‍या घटना घडतील हातून धार्मिक कार्य सहज पार पडतील देवदर्शन निमित्ताने प्रवास होईल.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आपल्या ओळखीच्या जवळच्या नातेवाईकांकडून त्रास संभवतो त्यावेळी आपण वाद-विवाद टाळावा हेच तुमच्या आणि तुमच्या घरच्या लोकांच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे.शेत जमीन राहत्या घराचे प्रश्न रेंगाळतील साधारण जून २०२१ नंतर  मनाप्रमाणे मार्गी लागतील मनाप्रमाणे प्रवास होतील हवे तसे अनुभव मिळतील उपासना कुलदेवीची 

उपासना : 

अवश्य करावी यावर्षी चांदीमध्ये मोती अंगठी वापरावी गळ्यात चांदीच्या लॉकेटमध्ये आराध्य देवतेचे प्रतिमा ठेवावी. 



Post a Comment

0 Comments