अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग :
साबुसिंग पवार घराण्याचा इतिहास.....
महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर जी काही पवार घराणी विखुरलेली आहे. त्याचे मूळ वास्तव्याचे ठिकाण माळवा मध्ये धार या ठिकाणी असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला त्याचे एक कुटुंब महाराष्ट्रात आले आणि ते कायम महाराष्ट्राचे झाले. त्याचा मूळ पुरुष साबूसिंग उर्फ शिवाजी पवार हा होता. इसवी सन १६५७मध्ये कोकण प्रांत घेण्यासाठी साबूसिंग यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली शिवाजीमहाराजांनी त्या वेळेला कल्याणवर स्वारी केली. त्या वेळेला साबूसिंग यांनी पराक्रम गाजवला तेव्हापासून साबूसिंगवर शिवाजी महाराजांचा विश्वास बसला.
अहमदनगर सुभ्या मध्ये साबूसिंगाने सुपेवाडी उर्फ सुपे हे गाव वसलेले आहे . त्या सुपे गावची पाटीलकीची व्यवस्था पाहण्याचे काम शिवाजी महाराज यांनी साबूसिंग यांना दिले. सुपे गावाच्या शिवेवर लागून असलेला हंगे या गावाशी एक सारख्या कटकटी भांडण लागून मारामारी होत होत्या अशाच एका भांडणांमध्ये सन १६५८ मध्ये साबूसिंग मारला गेला. त्याचा मुलगा कृष्णाजी पवार याच्या कारकिर्दीत पासून पवार घराण्याच्या इतिहासाला गती मिळाली कारण शिवाजी महाराजांनी कृष्णाजी यांना सन१६७७ मध्ये आपल्या खास पागेचा सरदार म्हणून नेमणूक केली. कृष्णाजी हा अफजलखान व नंतर फाजलखान यांच्याशी झालेल्या लढाईत महाराजांबरोबर होता. याप्रसंगी कृष्णाजी पवार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली शिवाजी महाराजांनी कृष्णाजी यांना खुश होऊन कणगी व करणगाव ही दोन गावे इनाम म्हणून दिली. सुपे गावची गडीही कृष्णाजी पवार यांनीच बांधली कृष्णाजी यांना बुवाजी, रायाजी व केरोजी ही तीन मुले होती. कृष्णाजी यांचा वारसा तिन्ही मुलांनी पुढे चालवला . मराठ्यांच्या इतिहासात झालेल्या युद्धामध्ये त्यांनी मर्दमुकी गाजवली शिवाजी महाराजांच्या ३० महत्त्वाचे सरदारांपैकी बुवाजी हादेखील वडिलांसारखा पागेचा निवडक सरदार झाला होता. या बंधूंनी कर्नाटकामध्ये महाराजांबरोबर स्वारी मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावल्या असे नारायण आव्हाड यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर खूप मोठे संकट कोसळले . त्यावेळी राजाराम महाराजांनी पवार घराण्याला खूप जवळ केले. मोगल सैन्य याविरोधात गोदावरीच्या काठी वेगवेगळ्या ठिकाणी बुवाजी , रायाजी , केरोजी या बंधूंनी मोगल सैनिकांवर अनेक ठिकाणी हल्ले केले त्यावर खुश होऊन राजारामांनी बुवाजी यांना विश्वासराव ही सन्मानदर्शक पदवी दिली व केरोजी यांना 'सेना बारा सहस्त्री ' पदवी देऊन गौरविण्यात आले.
लेखक : नारायण आव्हाड
९२७३८५८४५७
संदर्भ : संग्रहालय लायब्ररी
आवृत्ती २०२१
1 Comments
चांगली आणि वेगळी माहिती दिल्याबद्दल आव्हाड
ReplyDeleteयांचे अभिनंदन💐