पी. ओ .पी. च्या गणेश मूर्ती अधिक पर्यावरण पूरक : उच्च न्यायालय

पीओपी विरुद्ध शाडूच्या मूर्तीचा वाद : 

पी.ओ.पी.च्या गणेश मूर्ती अधिक पर्यावरण पूरक : उच्च न्यायालय 


मुंबई :
गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतानाच नेमेची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे दरवर्षी  पी.ओ.पी चे गणपती की शाडूमातीचे गणपती हा वाद नेहमी ऐरणीवर यायचा.मात्र येत्या गणेशोत्सवापूर्वीच  मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात  आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली असून या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.

‘सरकारला समिती नेमण्याचे आदेश’

न्यायालयाने राज्य सरकारला आता तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही. मात्र, पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील. या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.

पीओपी विरुद्ध शाडूच्या मूर्तीचा वाद

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तीं विरुद्ध शाडूच्या मूर्ती हा वाद सध्या सुरू आहे. विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी देणे शक्य असल्याचा दावा राज्य सरकारने याआधी उच्च न्यायालयात केला आहे. समितीच्या शिफारशींचा अहवाल निर्णयासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावरील बंदी संदर्भात राज्य सरकारने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे समितीचा अहवाल ५ मे रोजी पाठवला आहे.मात्र याच पार्श्वभूमीवर डब्लू एच ओ सारख्या जगमान्य संशोधन संस्थे कडून या संदर्भात संशोधन करण्यात आल्याने त्यांनी आणि अन्य मान्यवर संशोधकांनी देखील शाडू माती पेक्षा पी. ओ .पीच्या मूर्ती पर्यावरणाला हानिकारक नसल्याचा निर्णय दिला आहे. 

Post a Comment

0 Comments