आरोग्य आहार
रताळ्याची टिक्की
साहित्य:
दोन मोठे रताळे, एक काकडी, अर्धी वाटी राजगिरा पीठ, अर्धी वाटी शिंगाडा पीठ, आलं हिरवी मिर्चीची पेस्ट, जाडसर बारीक केलेले जिरे, मीठ, कोथिंबीर, साजूक तूप.
कृती :
प्रथम रताळी उकडून घ्यावी. ते मळून घ्यावेत. त्यामध्ये किसलेली काकडी, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ,आले हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मळून घ्यावे. पिठाच्या वेगवेगळ्या आकारात टिक्की करून घ्याव्यात. तव्यावर साजूक तूप टाकून दोन्ही बाजूंनी गुलाबीसर भाजून घ्यावे.
ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
पोषणमूल्ये :
राजगिऱ्यातील प्रोटीन पचायला सोपे असते. त्याचप्रमाणे कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर आहे. रताळ्या तील बी सिक्स विटामिन मुळे टिक्की खूपच पौष्टिक होते
अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५
* Dietitian and Nutritionist
* B.Sc in Food Science and Nutrition
* Diploma in Nutrition and Health Education
* Diploma in Yog Shikshak
0 Comments