रविवारी अद्भुत रोग निदान शिबीराचे आयोजन

    वेब टीम  नगर,दि. २६ - मलेशियन अ‍ॅक्युन्युट्री संस्था, महाराष्ट्र आयोजित अद्भुत रोग निदान शिबीराचे रविवार दि. १ मार्च  रोजी स. १० ते सायं.७ वाजपर्यंत हॉटेल यश ग्रँड, रेल्वेस्टेशन रोड, येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात पॅरालिसेस, डायबेटिस, सफेद कोड, सोयरायसीस, व्हेरीकोज व्हेन, थॉयरायई, स्त्रींचे विविध आजार, तसेच जुनी सर्दी, हिमोग्लोबिन, किडनी स्टोन, गुडघेदुखी, मणकेदुखी, सांधे दुखी, तसेच व्यसनमुक्ती आदि आजारांवर नाशिक येथील तज्ञ डॉ. अजित बागमार हे तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहेत.
     या शिबीरासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी पारस गुंदेचा (मो.८३२९८६२८५७) यांच्याशी संपर्क साधावा.  तरी या शिबीराचा व्यधीग्रस्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments