प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार

प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार 

आयुक्त यशवंत डांगे : नगर शहरातील नाट्य कलाकारांनी घेतली आयुक्त यांची भेट

नगर :  प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुलनाचे काम अनेक महिन्यांपासून बंद पडले असून त्याचे काम कधी पूर्ण होणार यासाठी शहरातील नाट्य कलाकारांनी आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, प्रसाद बेडेकर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर शाखा,नाट्य कलाकार स्वप्नील मुनोत,संगीत क्षेत्रातील पवन नाईक, महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजान आदी  उपस्थित होते.

           आयुक्त यशवंत डांगे यांनी बोलताना नाट्य कलाकारांना सांगितले की, नाट्य संकुलनाचे पूर्वीचे ठेकेदार यांचे दुर्दैवी मृत्यू झाला असल्यामुळे अडचण निर्माण झाली होती त्यामुळे ते काम बंद अवस्थेत आहे. आता ती निविदा रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवली असून ती पूर्ण देखील झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये नाट्य संकुलनाचे काम पूर्ण होईल असे ते म्हणाले.

 नगर शहराला सांस्कृतिक नाट्यकलेचा वारसा लाभलेला आहे. शहरातील नागरिकांचे हक्काचे नाट्य संकुल व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही कारणास्तव संकुलनाचे काम रेंगाळले आहे. हे काम मार्गी लागावे यासाठी नाट्य कलाकारांनी पुढाकार घेतला असून ते लवकरच मार्गी लागेल असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments