इतिहासाच्या पाऊलखुणा : महाराणी येसूबाई

इतिहासाच्या पाऊलखुणा : महाराणी येसूबाई

"महाराणी येसूबाई" महापतिव्रता म्हणून इतिहास त्यांचा उल्लेख करतो.त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यापत्नी म्हणून इतिहासात त्यांची ओळख आहे.  महाराष्ट्रातील सर्व स्त्री मनाला त्यांच्या कार्याविषयी माहिती होण्यासाठी हा प्रपंच करीत आहे.त्यांनी पतीच्या निधनानंतर काळ्यापाण्याची शिक्षा तीस वर्षे भोगणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव स्त्री म्हणून त्यांची गणना केली जाते.

हिंदवी स्वराज्याच्या निर्माण कार्यात राजमाता जिजाऊ यांनी महत्वाची भूमिका निभावली.त्याप्रमाणे आणखी दोन स्त्रियांच्या फार महत्वाच्या भूमिका आहेत.या स्त्रिया म्हणजे १."महाराणी येसूबाई" आणि २."राणी ताराबाई" छत्रपती राजाराम महाराज यांच्या धर्मपत्नी. यापैकी 'महाराणी येसूबाई' विषयी त्यांच्या कार्याविषयी बोलायचं झालं तर त्यांचे वडील पिलाजी शिर्के.शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे यांचे कारभारी म्हणून काम पाहत होते. येसुबाई यांना त्यांना दोन भाऊ होते.१.गणोजी शिर्के आणि २. देवजी शिर्के.पैकी गणोजी शिर्के व  संभाजी महाराज यांच्यात वतना वरून काही वादविवाद झाला आणि त्यांनी संभाजी महाराज यांना पकडून देण्यास औरंगजेबास मदत केली असो. शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी या ग्रंथात शिर्के घराण्याचा इतिहास श्लोक रूपाने दिला आहे.  'येसूबाई' यांचा माहेरी जिऊबाई असे त्यांचे नाव होते परंतु सासुबाई राजमाता जिजाबाई व नातं सुनेचे नाव जिऊबाई ही नावे सासरी योग्य वाटली  नाहीत.कदाचित त्यामुळे त्यांचे सासरी येसूबाई म्हणून नाव ठेवले गेले.येसूबाई साधारण पाच-सहा वर्षाच्या असतील त्यावेळेला त्यांचे संभाजीमहाराज यांच्याशी विवाह झाला.शिर्के घराणे हे मातब्बर व प्रभु रामचंद्राचे वंशज मानले जात होते.त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणासाठी दोन विद्वान पंडित होते.त्यांचे नाव १.केशव पंडित व २.रघुनाथ पंडित होते.लग्नानंतर संभाजी महाराज व येसूबाई यांना 'प्रयोगरूप रामायण' हे शिवाजी महाराजांच्या पदरी राहूनच त्यांनी ऐकवले होते. लग्नानंतर त्यांना एक वर्षात खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले होते.त्याचे असे झाले की शिवाजी महाराज व संभाजी महाराज औरंगजेबाच्या भेटण्यासाठी दिल्लीस गेले आणि त्यांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.परंतु शिवाजी महाराज सहीसलामत सुटले रायगडावर आल्यावर त्याने सांगितले कि संभाजी महाराजांचा वाटेत मृत्यु झाला.या अफवेमुळे शत्रू बेसावध राहीला व संभाजी राजे लपत-छपत एक दिवस रायगडावर येऊन पोहोचले.हे सर्व घडेपर्यंत सासुबाई कोण हालत झाली ती शब्दात वर्णन करणे अवघड आहे.

राजमाता जिजाबाई यांचे १७ जून १६७४  रोजी देहावसान झाले.संभाजीराजे पोरके झाले कारण त्यांना लहानपणापासून सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केला होता.महाराणी येसूबाई याच संभाजीराजे यांच्या आधार झाल्या.त्याच वेळेला दिलेरखानाने स्वराज्या मध्ये धुमाकूळ घातला होता.भूपाळगडावर दिलेरखानाने ७०० मराठ्यांचे हात कापून काढले.ही धामधूम चालू असताना ध्यानीमनी नसताना छत्रपती शिवाजी महाराज किरकोळ आजाराने मृत्यु पावले.  हिंदवी स्वराज्य पोरके झाले.घरातील वडीलधारी दोनही माणसं निघून गेली.त्या वेळेला येसूबाई या संभाजी महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.राणी येसूबाई या संभाजीराजे यांच्या मोठ्या हिमतीने, विश्वासाने खंबीरपणे स्वराज्याचा कारभार चालवत होत्या. परंतु हे नियतीला मान्य नव्हते.  संभाजीराजे खेळण्या वरून रायगडाकडे चालले असताना मोगल सरदार यांच्याकडून बेसावध असताना पकडले गेले. या ठिकाणी आप्तांपैकी कोणीतरी फितूर झाले असावे त्याशिवाय हे घडू शकत नव्हते.संभाजीराजांना कैद केल्यानंतर त्यांची धिंड काढली ३२ मैल फिरवले, विदूषकाचे कपडे घातले, त्यांचा मानेशी लाकडी खोड घातला वैगेरे बातम्या रोज रायगडावर येत असत. परंतु 'महाराणी येसूबाई'  यांनी गोष्टींना धैर्याने सहन केले असे नारायणराव आव्हाड यांनी  सांगितले.संभाजी राजे यांच्या वधाने संकटाची मालिका संपली नाही.रायगडाचा वेढा अधिक तीव्र केला गेला.त्या वेळेला 'येसुबाईने' शहाणपणाचा विचार केला की,वाटाघाटी शिवाय पर्याय नाही आपली जीवित हानी होणार नाही व आपल्या आब्रूलाही ही धक्का लागणार नाही. त्याप्रमाणे सन  १६८९ मध्ये शाहू महाराजांसह मोगलांच्या त्या कैदी बनल्या आणि औरंगजेबाच्या ज्या ज्या ठिकाणी छावण्या पडत असे.त्या त्या ठिकाणी त्या फिरत होत्या. त्यामुळे मोगल सैन्यात बरोबर मराठा कैद्यांचे खूप हाल झाले.दुष्काळामुळे अन्न-पाण्यावाचून राहावे लागत होते.पुढे त्यांच्यावर धर्म संकट कोसळले औरंगजेबाने शाहू महाराज यांना मुसलमान करण्याचा घाट घातला होता.परंतु त्यास जोराने विरोध केला तेव्हा ते संकट टळले.याप्रमाणे अनेक संकटावर मात करत मजल दर मजल करत १६ नोव्हेंबर सन १७०४  इसवीसन रोजी महाराणी येसूबाई व शाहू राजे अहमदनगर येथे बहादूर गडावरून (घोडनदी) पोहोचले.तो त्यांचा मुक्काम जवळजवळ तीन वर्षे होता.म्हणजे फेब्रुवारी सण १७०७ पर्यंत म्हणजे औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंतच्या अहमदनगर येथे राहिल्या परंतु नगर मुक्कामी त्यांच्या विषयीची माहिती उपलब्ध नाही.पुढे दिल्लीला गेल्यावर त्यांना लाल किल्ल्यात कैदी म्हणून ठेवले होते.अखबारीतील नोंदीनुसार 'झीनतबेगम' यांनी त्यांच्या कैदे पासून सुटके पर्यंत पर्यंत त्याची काळजी घेत असे.त्या सतत त्यांच्या बरोबर असायच्या.त्यांना काय हवे नको ते पाहत होत्या.असे नारायणराव आव्हाड म्हणाले.  

कालांतराने महाराणी येसूबाई दिल्लीहून परत स्वराज्यात आल्या त्यावेळेला त्यांच्याबरोबर बाळाजी विश्वनाथ, मदनसिंग, शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई व इतर इतर जण बरोबर होते.बाळाजी विश्वनाथ यांना चौथाईची सनद ३ मार्च रोजी मिळाली व १५ मार्चला सरदेशमुखीची सनद दिली व नंतर सर्वांना सोडून देण्यात आले ती तारीख होती.१२ एप्रिल १७१९ रोजी ते सर्वजण मजल दर मजल करीत मुक्काम करीत शिरगाव जिल्हा औरंगाबाद मार्गे टेंभापुरी मार्गे प्रवरासंगम येथे अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी प्रवेश केला आणि नंतर माळीचिंचोरा, सोनई, ब्राह्मणी, सारोळे ,पारगाव इत्यादी ठिकाणी मुक्काम करून नंतर जेजुरी, सासवड ,अहिरे ,गोडवली मार्गे किल्ले सातारा याप्रमाणे महाराणी येसूबाई साहेब व इतर बाळाजी विश्वनाथ यांचे सह दि. ४ जुलै १७१९ रोजी सातारा पोहोचल्या वरील प्रमाणे महाराणी येसूबाई या दिल्लीला जाताना अहमदनगर येथे ३ वर्षे राहिला परंतु येताना अहमदनगर जिल्ह्यातील ६-७ गावी  एक-एक दिवस मुक्काम करून पुढे गेल्या असे वाटते परंतु त्यांची नोंद उपलब्ध नाही.याची इतिहास अभ्यासकांनी नोंद घेतली तर बरे होईल त्यामुळे नवीन इतिहास समाजास माहीत होईल. 

लेखक : नारायण आव्हाड 

मो.92 73 85 84 57/ 98 81 96 36 03 

संदर्भ:  येसूबाई 

ऐतिहासिक वस्तू संग्रहालय लायब्ररी,

अहमदनगर


Post a Comment

0 Comments