“भारतीयांसोबत गैरव्यवहार केला आणि मुलींना तर …”

“भारतीयांसोबत गैरव्यवहार केला आणि मुलींना तर …”

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला विदारक अनुभव

या मुलांचे अनुभव  ऐकल्यावर पालकांच्याच काय कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

वेब टीम नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम राबवण्यात येत आहे.

युद्धभूमीतून भारतात सुखरुप परतलेल्या आपल्या लेकराला पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला. रोमानियाच्या सीमेवरून भारत सरकारने परत आणलेल्या एका विद्यार्थ्याची आई म्हणाली, मला वाटलंच नव्हतं की आता माझा मुलगा कधी परत येऊ शकेल. मी रोज फक्त प्रार्थना करत होते, आजही. मी आज सकाळीच गणपती आणि हनुमानाची प्रार्थना केली की माझा मुलगा सुखरुप भारतात परतू देत.

हे चित्र आहे विमानतळावरचं. युद्धभूमीत अडकलेल्या आपल्या लेकरांच्या परतीची आतुरतेने वाट पाहणारे पालक या विमानतळावर रोज दिसतात, आपल्या लेकरांना पाहून त्यांना अश्रू अनावर होतात. मात्र या मुलांचे  अनुभव  ऐकल्यावर पालकांच्याच काय कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

टर्नोपिल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी आदित्यला पोलंड सीमेवरून भारतात परत आणण्यात यश आलं. बॉम्बहल्ले आणि गोळीबारादरम्यान तो जिथे अडकला होता तिथून २०० किलोमीटर अंतरावर असलेली शेयनी सीमा पार केली. या प्रवासात आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागला. त्याने सांगितलं की २०० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी ८ ते ९ तास लागले. शिवाय, टॅक्सीवाल्याला अर्ध्या रस्त्यातच सोडावं लागलं कारण त्याला ठराविक अंतर पुढे जाता येत नव्हतं. भारतीयांना परवानगी नाही असं म्हणत अर्ध्या रस्त्यात अडवण्यात आलं, मुलींना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला आणि भारतीयांबरोबर गैरव्यवहार करण्यात आला, असं आदित्यने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

आम्ही जेव्हा एका चेकपोस्टला पोचलो तेव्हा आम्ही तिथे पाहिलं की एक विद्यार्थी चार दिवसांपासून तिथेच बसून होता. पुढच्या काही चेकपोस्ट्सवरची परिस्थितीही अशीच होती, असंही या विद्यार्थ्याने सांगितलं.

Post a Comment

0 Comments