भयंकर .... !!! अल्पवयीन मुलीवर पित्यानेच वारंवार केला बलात्कार

भयंकर .... !!! अल्पवयीन मुलीवर पित्यानेच  वारंवार केला बलात्कार

वेब टीम विशाखापट्टण : अल्पवयीन मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याने पित्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापलेल्या पित्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. मुलीने शिक्षिकेला याबद्दल माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आघाताचा सामना करू न शकलेल्या मुलीने नुकतंच तिच्या शिक्षिकेला झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले. शिक्षिकेने तिच्या वडिलांना शाळेत बोलावले आणि विचारणा केली असात आरोपीने माफी मागितली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यानंतर शिक्षिका आणि मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे.

तपासादरम्यान दोन वर्षांपूर्वी आरोपीची किडनी निकामी झाल्याने तो आजारी पडल्याचे पोलिसांना आढळले. त्याच्या पत्नीने त्यांना किडनी दान केली होती. पाच महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आजारी पडली होती आणि तिच्यावर तिच्या आईच्या घरी उपचार सुरू होते. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी वडिलांची काळजी घेत होती. मात्र, ती मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याचा राग आरोपीला होता. रागाच्या भरात त्याने गेल्या काही महिन्यांत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments