अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 नदी सरस्वती चे नगर जिल्ह्यातील अस्तित्व 

सरस्वती तीर्थक्षेत्र श्रीपूर  अथवा श्रीगोंदा हे  क्षेत्र 'सरस्वती' नदीच्या तीरावर वसले आहे.  भारतामध्ये सरस्वती नदीच्या तीरावर गाव असे अपवादात्मकपणे    आढळते.  महाराष्ट्र मध्ये श्रीगोंदा वगळता सरस्वती नदी अन्यत्र कोठेही आढळत नाही . सरस्वती नदी गुप्तपणे वाहते हे वैदिक कालापासून समाजामध्ये रूढ झालेले आहे.  कृष्णा, गोदावरी या नद्यांमध्ये ती सुप्त रूपाने वाहते .  श्रीगोंदा पंचक्रोशीत चोराचीवाडी पासून पेडगाव पर्यंत सहा किलोमीटरचा प्रवास सरस्वती उघडपणे करीत आहे., पुढे ती भीमा नदीला पेडगाव जवळ मिळते भीमा ,सरस्वती नद्यांचा  पुढे संगम दक्षिण भारतात श्रीगोंदातच  पाहावयास मिळतो.  श्रीगोंदा मध्ये सरस्वती नदीचे पात्र पाहिले की आपल्याला कळते ही नदी किती मोठी होती, आणि ती पूर्वी बारमाही वाहत होती व तिचे पात्र 20 ते 25 किलोमीटर पर्यंत होते.  भीमा नदीला आरपार भेदून  आपला वेगळा ठसा दाखवते.  पेडगाव जवळील किनाऱ्यावरील ऐतिहासिक बांधकामे पाहिली की तिच्या  खोलीची कल्पना येते. 

भीमा नदी अहमदनगर जिल्ह्यातून दक्षिण पारनेर, दक्षिण श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातून वाहते नगर जिल्ह्यामध्ये सांगवी दुमाला या गावाजवळून ती प्रवेश करते अहमदनगर पुणे सरहद्दीवरून साठ  किलोमीटरचा तिचा प्रवास होतो . भीमा नदीच्या डाव्या तीरावरून  घोड नदी मिळते व पुढे सरस्वती लोहकरा नानी या नद्या मिळतात.  श्री संत शेख महंमद महाराज  यांच्या कवितासंग्रहात लिहिलेल्या पंढरी क्षेत्र रूपकात त्याचा उल्लेख मिळतो तो खालील प्रमाणे "आदिशक्ती श्रीहाटा पासून I पुढे गोल्हाट जाण I औटपीठ  अर्ध  मातृका निरंजन लक्षीयलेII १४II   पुढे भ्रमर गुंफा शिखर I  सरतरावी  भीमा वाहे साचार II  पुंडलिका निर्धारI  देखोनी  उभा हरीI  गरुडाची टीका दिधली   मना I  बारा सोळा  गोपिका जाणा I भक्तीन  विविध निर्गुणा  राधा भाळलीसे I  सांडोनी छत्ती  साची मामा I  शेख महंमद जाला  सामोराI  ब्रह्मरंध्रे  स्वयंभू ईश्वरा दर्शन झालेII १७II  या रुपकामध्ये श्रीहाट  चा अर्थ श्रीपुर गोल्हाट  ज्ञानगोंदे अर्थात सरस्वती श्री शेख महंमद बाबा ज्ञानगोदावासी  झाले असे स्वतःला म्हणवतात याचा अर्थ ज्ञान म्हणजे सरस्वती व गोंदा म्हणजे गोविंद या दोन्हीचा आवर्जून उल्लेख करून सरस्वतीतिराचे  गोविंद स्वरूप (बालगोपाल स्वरूप )पांडुरंग पंढरपूरला पुंडलिकाच्या महायोगाने अनुभूत होण्यासाठी येतात हे महाराजांना सुचवायचे आहे असे वाटते . 



स्कंद  पुराणातील प्रभास खंडात सरस्वती नदी विषयी आलेली माहिती डॉ.  प्र. न .  जोशी यांनी स्कंदपुराण ग्रंथात ती वाचनीय कथा स्वरूपात मांडली आहे.  देवी, हरिणी व वजरीनी ,न्यूडकू,  कपिला सरस्वती आदी पाचस्रोत  युक्त या क्षेत्रातून प्रभास वाहते एकदा विष्णू सरस्वतीस म्हणाले कल्याणी तू पश्चिम दिशेला क्षीरसागरा  समोर  जा आणि वडवानलाला नेऊन तेथे ठेव त्यामुळे सर्व देवता निर्भय होतील, तेव्हा ती म्हणाली की मी स्वतंत्र नाही माझे पिता आहेत  त्यांची मी आज्ञाधारक आहे कन्या आहे तेव्हा विष्णू ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले देवेश्वर आपण देवांच्या कार्याची सिद्धी करावी त्यावर ब्रह्मदेव सरस्वतीला म्हणाले देवी तू घाबरलेल्या देवांचे रक्षण कर.  सरस्वती म्हणाली मी जाईन परंतु तो भयंकर वडवानल माझे शरीर जाळून टाकेल आणि पृथ्वीवर कलियुग आलेले आहे . त्यातील पापाचारी माणसे मला स्पर्श करतील .  त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तू पृथ्वीला स्पर्श करू शकत नाही तू पाताळात या वडवानलाला  घेऊन जा.  जेव्हा वडवानलाचा ताप अधिक होईल तेव्हा पृथ्वी भेदून  प्रवाहित होऊन सरस्वतीच्या नावाने प्रसिद्ध हो ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन सरस्वती आपल्या  तेजाने संपूर्ण जगाला प्रकाशित करत निघाली, त्यावेळेला गंगा,यमुना, गायत्री, सावित्री या नद्यांचे दर्शन घेतले.  नंतर हिमालय पर्वतावर येऊन एका वृक्षापासून ती नदी रूपात प्रगट झाली व पृथ्वीवर अवतरली त्यावेळेस ब्रह्मर्षीगण तिची स्तुती करू लागले.  वडवानलाला घेऊन ती वेगाने वाहू लागली  आणि पृथ्वी भेदून  पाताळात गेली.  कधी  कधी मृत्युलोकात प्रगट होत होती.  या प्रकारे पाताळ मार्गाने  सागरा जवळ गेली.  यादीशमोद   नावाच्या वनात पोहोचून सरस्वतीने सागराला पाहिले आणि वडवानलाला घेऊन जाण्याचा विचार करू लागली, तेव्हा दक्षिणेला मुख करून  निघाली तेव्हा वेद पारंगत चार विद्वान  महर्षी प्रभास क्षेत्रा मध्ये आले.  त्यांनी सरस्वतीला अलगस्नान करण्यासाठी आवाहन केले . त्या वेळेला सागरच सरस्वतीच्या समोर उभा राहिला आणि सरस्वतीला पाच धारेत विभक्त होऊन त्यांचे समाधान केले .  समुद्र म्हणाला त्या वडवानलाला माझ्या स्वाधीन कर सरस्वती वडवानलाला म्हणाली ज्याप्रमाणे अग्निदेव तुपाच्या आहुतीचा  स्वीकार करतो त्याप्रमाणे तू  जल  भक्षण करत राहा असे म्हणून तिने वडवानलाला समुद्राच्या हवाली केले त्यानंतर सरस्वती पुन्हा नदी होऊन नरदे ईश्वराच्या मार्गाने समुद्रात विलीन झाली सरस्वतीच्या सिद्ध रूपाने सर्वांच्या हृदयात  सरस्वती निवास करते वाणी रूपाने सर्वांच्या जिभेवर, नेत्रात  ज्योती रूपाने तीच वास करते. 

सरस्वतीचे श्रीगोंद्याचे हे पश्चिम घाट दंडकारण्यातील पात्र असून भीमाशंकर वरून निघालेली भीमा नदी भूवैकुंठ पंढरपूर येथे पोहोचण्यापूर्वी या वैकुंठ प्रदेशात भीमाला मिळते.  दंडकारण्यहीच सर्वच वैदिक परंपरेतील ऋषीमुनींची तपोभूमी आहे.  त्याभूमीत हे सरस्वती तीर्थ केवळ या ठिकाणी प्रकटले पुराणकथांच्या सर्व पाऊलखुणा येथे अनुभवायास येतात.  त्यामुळे केवळ काल्पनिक स्वरूपात या नदीला सरस्वती हे नाव मिळाले नाही, तर ते सरस्वतीचे पात्र शंभर ते दीडशे फूट रुंद आहे,असे ठामपणे सांगता येते . नारायण आव्हाड यांनी या नदीच्या शोधासाठी गेले असता त्यांना श्री भीमराव अंदोरे व भाऊसाहेब शिर्के यांनी खालील माहिती दिली.  मौजे पारगाव या गावाचे पश्चिमेस  सरस्वती नदी उगम पावते व पुढे मखरेवाडी वरून श्रीगोंद्याचे दक्षिण बाजूने प्रवाहित होऊन चोराचीवाडी या गावाच्या पूर्वेला पलीकडून घोडेगाव वरून देव नदी येते  त्यांचा' भिगान   खालसा 'याठिकाणी दोन्ही नद्यांचा संगम होतो संगमाच्या ठिकाणी महादेवाचे छोटेसे मंदिर आहे दोन्ही नदीच्या संगमाच्या नंतर त्या नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधलेला आहे.  त्यामुळे महादेवाचे मंदिर पाण्याखाली गेले . परंतु पूर्वेच्या बाजूने देव नदी येते व तिच्या संगमाच्या पाठीमागे साधारण शंभर मीटर दगडाचे कपारी वर जाणाई लक्ष्मी व पुरुषप्रधान असलेली एक मूर्ती अशा दीड फूट उंचीच्या तीन मूर्ती शेजारील ठेवलेल्या व तीन फूट बाय दोन फूट आकाराचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे ते पाहण्यासाठी श्री नारायण आव्हाड  तेथे  गेले असता . श्री भिमराव अंधोरे यांनी सांगितले की खूप जागृत देवस्थान आहे . आषाढ महिन्यात येथे यात्रा भरते त्यावेळी पंचक्रोशीतले हजारोच्या संख्येने लोक दर्शन करण्यास येतात . खूप गर्दी होते . मंदिराजवळ उभे राहण्यासाठी फक्त एक फुटाची जागा आहे त्यामुळे चोराचीवाडी चे ग्रामस्थांनी व तेथील वस्तीवरील लोकांनी वर्गणी करून छोट्या मंदिराच्या वरच्या बाजूला पठारावर मोठे मंदिर बांधले आहे जेणेकरून कोणाही व्यक्तीस देवीचे दर्शन घेता येते.  याप्रमाणे श्री अण्णा लक्ष्मण आमटे महादेव कोंडीबा पुराणे अक्षय मधुकर पुराणे भीमराव अंधोरे, भाऊसाहेब शिर्के या ग्रामस्थांनी माहिती दिली व श्री नारायण आव्हाड माहिती घेण्यासाठी आले म्हणून त्यांनी खूप आभार मानले व निरोप दिला. 

लेखक : नारायणराव आव्हाड 

(मोडीलिपी वाचक) ९८८१९६३६०३

 संदर्भ 'शोध पांडुरंगाचा' 

प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे प्रथम आवृत्ती २५ डिसेंबर २०१९




Post a Comment

0 Comments