मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार

मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना : पादांगुष्ठासन 

पद म्हणजे पाय आणि अन अंगुष्ठ  म्हणजे अंगठा, उभे राहून आणि अंगठे धरुन करायचे हे आसन आहे. 

 पद्धती : 

१) ताडासनात उभे रहा पायामध्ये एक फूट अंतर ठेवा. 

२)  श्वास सोडा पुढे वाका आणि अंगठा व पहिली दोन बोटे यांनी पायाचे अंगठे धरा त्यामुळे तळहात एकमेकांसमोर राहतील अंगठे घट्ट पकडून धरा. 

३)  डोके वर उचलून धरा पोट व छाती यामधील पडदा छातीकडे ताणा  आणि पाठ जास्तीत जास्त अंतर्गोल असुद्या खांद्यापासून वाकण्याऐवजी ओटीपोटापासून वाका म्हणजे कण्याच्या गुदास्थीजवळच्या भागापासून पाठीचा अंतर्गोल आकार योग्य तरेने राहिल. 

४) पाय ताठ ठेवा आणि गुडघे व अंगठे यावरील पकड सैल  होऊ देऊ नका ,खांद्याची पाती ताणून धरा या स्थितीत एकदा किंवा दोनदा श्वसन करा.  

५) आता श्वास सोडा गुडघे घट्ट आवळून आणि अंगठे जमिनीवरुन न उचलता खेचून डोके गुडघ्याच्या मध्ये आणा, या स्थितीमध्ये नेहमीसारखे श्वसन करत सुमारे वीस सेकंद राहा. 

६) श्वास घ्या अंगठे सोडा आणि उभे राहा.  पुन्हा ताडासनात या. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार : सरसो का साग

 साहित्य : एक किलो मोहरीची भाजी ,अर्धा किलो पालक ,अर्धा किलो कांदे ,३  इंच आले., एक मोठी गडडी लसूण सोलून , एक वाटी साजूक तूप, एक वाटी मक्याचा आटा , पाव किलो टोमॅटो, पाच-सहा हिरव्या मिरच्या वाटून, एक चहाचा चमचा लाल तिखट ,एक चहाचा चमचा हळद ,एक चहाचा चमचा जिरे, मीठ चवीनुसार . 

कृती :

 १)मोहरीची भाजी व पालक चिरून बारीक चिरून घ्यावा.मोहरीची भाजी व पालक एकत्र करून एक वाटी पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवायला ठेवावे.  मोहरीची भाजी शिजायला वेळ लागतो.  पूर्ण प्रेशर आल्यावर सात मिनिटे अथवा चार शिट्ट्या देऊन भाजी शिजवून घ्यावी, भाजी शिजलीकी  डावाने अथवा रवीने चांगली घोटावी भाजी एकजीव घेतली गेली पाहिजे. 

२) कढईत एक वाटी साजूक तूप गरम करून बारीक चिरलेले कांदे घालावे, कांदा परतला गेला कि एक चमचा जिरे व वाटलेले आले लसूण घालावे, लाल तिखट, हळद घालावी. वाटलेली मिरची, मसाला परतला गेला की टोमॅटो घालावे ,टोमॅटो शिजेपर्यंत मसाला परतावा वरील मसाला शिजवलेल्या भाजीत घालावा व मक्याचे पीठ व चवीनुसार मीठ घालून भाजी घोटावी भाजीला एक उकळी येऊ द्यावी भाजी पळीवाढ करावी जास्त पातळ करू नये. 

३) सरसो का साग, मक्याची रोटी, ताजे पांढरे लोणी व घट्ट गोड दही याबरोबर खाण्याची पद्धत आहे. 

 टीप : 

१)मोहरीच्या भाजी बरोबर पालक घातल्याने भाजी उग्र लागत नाही व मिळून येते .

 २) मक्याची रोटी नसल्यास साधा पराठा किंवा तंदुरी रोटी बरोबर भाजी चांगली लागते. 

 भाजी उष्ण असल्याने  हिवाळ्यात खायची पद्धत आहे. 

Post a Comment

0 Comments