अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,आरोपीस १३ वर्ष सश्रम कारावास व १५,००० चा दंड

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार , आरोपीस १३ वर्ष सश्रम कारावास व १५,००० चा दंड 

वेब टीम नगर :  नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील इ.१० वी च्या वर्गात शिकत  असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार करणार्‍या मुख्तार रज्जाक शेख (वय २५)रा.महालक्ष्मी हिवरे या आरोपीस  न्यायालयाने १३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 सविस्तर माहिती अशी की,अल्पवयीन मुलगी हि इ १० वीच्या वर्गामध्ये जात असताना आरोपी मुख्तार रज्जाक शेख वय 25 हा त्याच्या स्वतःच्या इंडिका कार मधून तीचा पाठलाग केला व तिला प्रेमाचे,लग्नाचे अमीष दाखवून त्याने  इंडिका कार मध्ये तिला बळजबरीने बसवून पळवून नेले,आरोपीने सदर अल्पवयीन मुलीला पैठण, जालना, रायपूर, छत्तीसगड, पिंपरी खालसा ता.लोणार, कृष्ण पुरी तांडा ता.चाळीसगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर शाररिक अत्याचार केले.पुढे पोलीस व फिर्यादी पीडितेच्या नातेवाईक यांनी आरोपीसचा शोध घेतला असता सुमारे एका महिन्याने सदर अल्पवयीन मुलगी हि आरोपीच्या ताब्यात रायपूर येथे मिळून आली त्यांना सोनाई पोलीस स्टेशन येथे हजर केले सदर घटनेबाबत पीडितेच्या वडिलांनी सोनई पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपीं विरुद्ध भा.द.वि.कलम तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधीनियम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास सोनई पो.स्टे.सहा.पो.नि.फारूकमिया शेख व उप.पो.नि.किरण शिंदे यांनी करून दोष आरोपपत्र न्यायालयात दाखल केले सदर खटल्यात चौकशी कामी एकूण ९ साक्षीदार सरकारपक्षातार्फे तपासण्यात आले सदरच्या केस मध्ये सदर मुलगी वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या न्यायालयासमोर आलेले साक्षी पुरावे व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद तसेच सरकारी वकील यांनी न्यायालयात सादर केलेले माजी उच्च व सर्वोच्च न्यायलायचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने दोषी धरले या खटल्यातील पीडित हि शाळेत जाणारी अल्पवयीन मुलगी असून आरोपी हा विवाहित आहे. सदर मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी राज्याबाहेर नेऊन सुमारे एक महिना तिच्यावर शाररिक अत्याचार केले अशा घटनांचा समाज मनावर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे दोष सिद्ध होत असलेल्या अशा घटनांमधील आरोपीना जास्त व कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे म्हणून आरोपीला शिक्षेबाबत कुठल्याही प्रकारची सहानभूती दाखविता येणार नाही असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.तापकिरे यांनी निकालपत्रात नमूद करून आरोपीस शिक्षा सुनावली आहे.

आरोपीस सदर गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायदा कलम ५ व ६ अन्वये १० वर्ष सश्रम कारावास व रक्कम रुपये १०,००० व दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद भादवि कलम ३६३ अन्यवये ३ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास १ महिना सध्या कैदेची शिक्षा सुनावली. सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति.सरकारी वकील देवा काळे यांनी काम पहिले त्यांना पैरवी अधीकारी अनिल जाधव, पो.कॉ,गणेश चव्हाण, .पो.कॉ.गणेश आढागळे, पो.कॉ. सुभाष हजारे, पो.कॉ.ज्योती नवगिरे, पो.कॉ. मोहन शिंदे यांचे सहकार्य लाभले. 
Post a Comment

0 Comments