चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई

 चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई 

वेब टीम नगर : नायलॉन मांज्या मुळे घडणाऱ्या दुर्घटनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पोलिसांनी आता अशा प्रकारचा मांजा विकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली असून त्यांच्यावर आय.पी.,सी कलाम ३३६ आणि कलाम १८८ नुसार कारवाई करण्यात येत असुन पर्यावरण संरक्षण अधिनियम ५ आणि १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे . 

सध्या शहरातील आनंदी बाजार, लक्ष्मी कॉर्नर स्वामी विवेकानंद चौक, भूषण नगर , झेंडीगेट , आदी भागात पोलिसांनी धाडी टाकून चायना मांजाच्या चकऱ्या , मांजा , आदी जप्त केला आहे.     

शहरात या मांज्यामुळे घडणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने हि कारवाई करण्यात येत असून नाशिक मध्येही एका महिलेचा मुत्यू झाल्याने नाशिक पोलीसांनी या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . ज्या मुलांकडे हा नायलॉनचा मांजा दिसेल त्या मुलांच्या पालकांवर कारवाई चे आदेश जारी करण्यात आले आहेत . या आदेशामुळे नायलॉन  मांजाचा वापर करण्याऱ्यांच्या पालकांना कठोर  कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

Post a Comment

0 Comments