मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 

परीवृत्त त्रिकोणासन

 परीवृत्त म्हणजे फिरवलेला किंवा भोवती अगर मागे वळलेला.  फिरविलेल्या त्रिकोणाच्या स्थितीवर आधारलेले हे आसन  आहे.  याच्यातील स्थिती उत्थित त्रिकोण असण्याच्या उलट असते.  

पद्धती : 

१) ताडासनात उभे रहा दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारून दोन्ही पायात अंतर घ्या, तीन ते साडेतीन फूट अंतर दोन पायात राहिले पाहिजे दोन्ही हात बाजूनी उचला आणि खांद्याच्या रेषेत आणा.तळहात जमिनीकडे वळवा. 

२)  उजवे पाऊल  नव्वद अंशाच्या कोनात उजवीकडे वळवा डावे पाऊल  साठ अंशांनी डावीकडे वळवा, डावा पाय सरळ ताणलेला आणि गुडघ्याशी  आवळलेला असू द्या.  

३) श्वास सोडा व डाव्या पायासहीत विरुद्ध दिशेला उजवीकडे वळून डावा तळहात उजव्या पावलाच्या बाहेरच्या कडेशी जमिनीवर टेकवा. 

४) उजवा हात डाव्या  हाताच्या रेषेत उंचवा आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावर दृष्टी खिळवा.

५) गुढघे  घट्ट आवळलेले असुद्यात उजव्या पायाची बोटे जमिनीपासून उचलू नका डाळ्या पावलाची बाहेरची कड जमिनीवर चांगली टेकून ठेवण्याचे ध्यानात राहू द्या.  

६) दोन्ही खांदे आणि खांद्याची पाती ताणलेली असु द्या. 

 ७) नेहमीप्रमाणे श्वसन करत करत या स्थितीत अर्धा मिनिट उभे  राहा.  

८)श्वास घ्या डाव्या हाताचा पंजा जमिनीवरून उचला

धड फिरून मूळ स्थितीत  आणा 

९) श्वास सोडा डावे पाऊल डावीकडे ९० अंश वळवा.उजवे  पाऊल डावीकडे ६० अंश वळवा आणि डाव्या पावलाच्या बाहेरच्या कडे जवळ उजवा तर हात जमिनीवर टेकवा आणि हे आसन पुन्हा करा. 

१०) दोन्ही बाजूकडील आसनाला सारखाच वेळ द्या प्रत्येक बाजूला तीन ते चार वेळा दीर्घ श्वसन करून वेळेचाही हिशोब ठेवता येईल.   

११) वेळ पूरा झाल्यावर श्वास घ्या धड उचलून पूर्वस्थितीत आणा पायाची बोटे पुढे ठेवा. 

१२) श्वास सोडा आणि उडी मारून ताडासनात या  येथे हे आसन  पूर्ण होते . 

परिणाम-

या  आसनामुळे मांड्या आणि पोटर्‍या तसेच गुडघ्या मागची धोंडशीर यांना सदृढता  येते पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू यांची कार्य योग्य तऱ्हेने होऊ लागतात . कारण, कण्याच्या खालच्या भागाचा रक्तपुरवठा या आसनामुळे वाढतो छाती पूर्णपणे फुगवली जाते या आसनामुळे पाठीच्या वेदना थांबतात पोटातील अवयव मजबूत होतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
गाजराच्या वड्या 

साहित्य :दोन वाट्या लाल गाजराचा किस, एक वाटी नारळाचा कीस, तीन वाट्या साखर , १०० ग्रॅम खवा , दोन चमचे पिठीसाखर ,व्हॅनिला इसेन्स दोन थेंब ,   बटर पेपर 

 कृती : 

गाजराचा किस,नारळाचा किस,साखर,१०० ग्रा खवा एकत्र करून जाड बुडाच्या पॅन मधे घालावे व माध्यम आचेवर गॅसवर ठेऊन सतत ढवळावे. 

मिश्रण आटले , भांड्याच्या कडेने सुटू लागले कि त्यात २ थेंब व्हॅनिला इसेंन्स आणि गाजरे लाल नसतील तर २ थेंब लाल रंग घालून गॅसवरून उतरवावे . २ टी स्पून पिठीसाखर घालून घोटून घ्यावे व मिश्रण ट्रे मध्ये एकसारखे पसरून घ्यावे. 

बटर पेपर च्या सह्याने सारखे पसरून पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. 

टीप : गाजराच्या सिझन मध्ये नारळ न वापरता नुसत्या गाजराच्या वड्या तर उत्तम . वड्या पौष्टिक होतात शिवाय गाजर हलव्यापेक्षा जास्त टिकतात.      

   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments