आयुष्यभर सांभाळण्याचे अमिश दाखवून ३८ वर्षीय महिलेवर आत्याचार

आयुष्यभर सांभाळण्याचे अमिश दाखवून ३८ वर्षीय महिलेवर आत्याचार 

वेब टीम नगर : आयुष्यभर सांभाळ करण्याचे आमिष दाखवून एका ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अक्रम बाबू सय्यद (वय ३८, रा. किराडपुरा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेडा परिसरातील एका ३८ वर्षांच्या महिलेला प्लॉटचे बांधकाम करायचे होते. त्यातून महिलेची अक्रम सय्यद याच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर अक्रम सय्यदने महिलेला आयुष्यभर सांभाळण्याची ग्वाही दिली. त्याचसोबत त्याने महिलेशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर अक्रम सय्यदने तिला विरोध केला. तसेच, जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. १६ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक महिलेच्या घरी आल्यावर त्याने स्वयंपाकाच्या ठिकाणी लघुशंका करून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. त्यावरून महिलेने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास

पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर नवले हे करत आहेत.-

Post a Comment

0 Comments