बाळ बोठेच्या अटकजमीन अर्जावर आता १ फेब्रुवारीला सुनावणी

बाळ बोठेच्या अटकजमीन अर्जावर आता १ फेब्रुवारीला सुनावणी 

 वेब टीम नगर : रेखा जरे हत्या कांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत बोठेला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही.बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज केल्यानंतर जिल्हा  व सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यानंतर बोठेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे जामिनासाठी अर्ज केला होता या अर्जावर मागच्या सुनावणीत आजची ( २८ जानेवारीची ) तारीख देण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीनंतर अटकपूर्व जामिनाची सुनावणी पुढे ढकलत १ फेब्रुवारी २०२१ ची तारीख देण्यात आली आहे.

जातेगाव घाटात झालेल्या रेखा जरे हत्या कांडातील  ५ जणांना हत्येनंतर ३० तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. मात्र गेल्या जवळपास २ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. जिल्हा पोलिसांकडून स्टँडिंग वॉरंट साठी अर्ज करून तो कोर्टाकडून मंजूरही करून घेण्यात आला आहे.तरीही बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. 

बाळ बोठेच्या मागावर राज्यातील ११०० पोलीस ठाण्यातील पोलीस बाळ बोठेच्या मागावर असून बाळ बोठे लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असे प्लॉईस अधीक्षक मनोज पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले होते.             

Post a Comment

0 Comments