शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाची युनोने घेतली दखल

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाची युनोने घेतली दखल 

वेब टीम नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

 पोलिसांनी आतापर्यंत ९३ जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर २०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.

गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावं

आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता,  ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण १३ कलमांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या घटनेची दाखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली असून त्यात अहिंसात्मक आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार असून ते त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी करू दिले पाहिजे.अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिली आहे.  



Post a Comment

0 Comments