नगर तालुक्यात काट्याच्या लढतीत २२ ठिकाणी सत्तांतर

 नगर तालुक्यात काट्याच्या लढतीत २२ ठिकाणी सत्तांतर  

प्रस्थापितांना धक्का देत नगर जिल्ह्यात काही ग्राम पंचायतीत सत्तांतर 

वेब टीम नगर : नगर जिल्ह्यातील ७०५ पैकी बहुतांश ग्रामपांचायतींचे निकाल लागले असून बाळासाहेब थोरात , राधाकृष्ण विखेपाटील , राम शिंदे आणि आमदार  काळे  यांना धक्के देत तर शंकरराव गडाख माजी आमदार कर्डीले,आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार यांनी आपापल्या परिसरातील गटातल्या ग्रामपांचातींमध्ये वर्चस्व सिद्ध केलं तर राळेगण सिद्धी आणि हिवरेबाजार या ठिकाणी गेल्या ३० वर्षांपासून बिनविरोधची परंपरा असलेल्या गावात यंदाही अण्णा हजारे प्रणित पॅनलने तर हिवरेबाजारात पोपट पवार यांनी एकहाती सत्ता काबीज केली आहे. 

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये थोरात गटाला धक्के देत विखे पाटील गटाने काही ग्रामपांचायती काबीज केल्या तर थोरात गटाने लोणी बुद्रुक ग्राम पंचायतीत राधाकृष्ण विखेपाटलांना धक्का देत ग्रामपंचायत जिंकली तर काकडी ग्रामपंचायतीत विद्यमान आमदार काळे गटाला धूळ चारत स्नेहलता कोल्हे गटाने विजय संपादन केला. ११ पैकी ८ जागांवर कोल्हे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला.बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीतही माजी आमदार शिवाजी कार्डिलें यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. नेवासे तालुक्यातील गगरपंचायतीमध्ये शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व कायम राहिले तर कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार गटाने राम शिंदे यांच्या पॅनलला धोबीपछाड देत चौंडी ग्रामपंचायत जिंकली तर नेवाश्यात शंकरराव गडाख यांनी आपला गड राखला. राहुरी तालुक्यात नामदार प्राजक्त तनपुरे यांचा बोलबाला कायम राहिला तर लोहसर मधे  अनिल गीते यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. बेलापूर ग्रामपंचायतीत गावकरी अंडळाने ११ जागा पटकावत सत्तांतर घडवले . 

 नगर तालुक्यात टाकळी काझी,डोंगरगण,इमामपूर,चिचोंडी,खडके खंडाळा आदी ग्रामपंचायतींच्या निकालावरून महासिकास आघाडी आणि भाजप यांच्यात काट्याची लढत झाल्याचे चित्र आहे. नांगर तालुक्यात ३० पैकी २२ ठिकाणी सत्तांतर झालं तर ज्या ठिकाणी सत्तांतर  झालं नाही त्या जागा काठावरच्या बहुमताने जिंकल्याचा स्पष्ट झालं आहे.  

         

Post a Comment

0 Comments