शिवसेनेने दानवेंवर फेकली शाई

 शिवसेनेने दानवेंवर फेकली शाई 

वेब टीम नगर : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान असल्याचा आरोप केल्याने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा व घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला. 

नगर मधील शिवसैनिकांनी दानवे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत दानवेंच्या बॅनरवर शाई फेकून निषेध व्यक्त केला यावेळी नगर  शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी पेटवलं डिझेलच्या दरवाढी संदर्भातही निदर्शने करण्यात आली. माजी महापौर भगवान फुलसौंदर , युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड , शहर प्रमुख दिलीप सातपुते , बाळासाहेब बोराटे , संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड , योगीराज गाडे , गिरीश जाधव, संग्राम कोतकर, शाम नळकांडे , मदन आढाव , दत्ता जाधव, राजेंद्र भगत,  संभाजी कदम, अभिषेक कळमकर , अनिल शिंदे , रमेश परतानी, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, रवींद्र वाकळे दीपक खैरे, अशोक दहिफळे , गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदी उपस्थित होते.     

Post a Comment

0 Comments