जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३,८१८ उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३,८१८ उमेदवारी अर्ज दाखल 

वेब टीम नगर : नगर जिल्ह्यातील माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची काल दि. ३० रोजी अंतिम तारीख होती. या दिवशी ७६७ ग्रामपंचायती च्या निवडणुकीसाठी २३,८१८ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.

काळ दिवस अखेर उमेदवारी अर्ज वारी भारलेल्यांमध्ये अकोले तालुक्यातील ५२ ग्राम पंचायतीमधून ११५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर संगमनेर तालुकयातील ९४ ग्रामपंचातयीतून २६७८, कोपरगाव तालुक्यातून २९ ग्राम पंचायतींनमधून ९९६, श्रीरामपूर मधील २७ ग्रामपंचायतींमधून ११०९,राहता २५ ग्रामपंचायतीतून १२०८, राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीतून १४०७ , नेवासे तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीतून २०७२, नगर तालुक्यातील ५९ ग्रामपान्हायतीतून १९२९ , पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीतून २३८९, पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीमधून २३२८ , शेवगाव तालुक्यातीळ ४८ ग्रामपंचायतीमधून १३३२,कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमधून १७५२, जामखेड तालुक्यातिळ ४९ ग्रामपंचायतीतून १३०२ तर श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीतून २१६३ अर्ज आले आहेत.

यातील उमेदवारी अर्ज ४ जानेवारीच्या दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत तर १५ जानेवारीला या ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सकाळी ७:३० ते सायं ५:३० पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.        


Post a Comment

0 Comments