विनापरवाना हुक्कापार्लरवर छापा

 विनापरवाना हुक्कापार्लरवर छापा 

१९ हुक्का बहाद्दरांना अटक ,हॉटेलचा मूळ मालक पसार 

 वेब टीम नगर : शहरातील व उपनगरातील वाढत्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. पोलिसांनी  एका हुक्का पार्लरवर छापा टाकला . या ठिकाणाहून १९ हुक्का बहाद्दरांना  अटक केली आहे. 

कल्याण रस्त्यावरील वरील दीपाली हॉटेल हे सचिन शिंदे यांच्या मालकीचे असून  विशाल सुपेकर आणि गणेश राजळे हे भागीदारीत हॉटेल चालवित होते.

तेथे विनापरवाना हुक्का पार्लर सुरू होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी दीपाली हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात १९ हुक्का बहाद्दरांना अटक केली.तसेच विनापरवाना हुक्का पार्लर चालविल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी ४५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान हॉटेलचे मूळ मालक सचिन चंद्रशेखर शिंदे हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

 अटक केलेल्या  हुक्का बहाद्दरांत ओंकार प्रवीण कडपील्ली (नालेगाव), भावेश कैलास कुरापाटी (दिल्लीगेट), रोहीत ज्ञानेश्वर गुडा (तोफखाना), मोमीन कुतुबुद्दीन मोवीन (रेल्वे स्टेशन), साहील सलीम शेख (रेल्वे स्टेशन),कार्तिक अशोक नरवडे (मोहिनीनगर, केडगाव), संतोष सूर्यभान शिरसाठ (दूधसागर, केडगाव), ओंकार नरेंद्र दुल्लम (बागडपट्टी), ओंकार गणेश रायपेल्ली (मोची गल्ली), रूपम गणेश भागवत (मोची गल्ली),मणियार शाहबल अब्दुल करीम (मोमीनपुरा), अजहर रफीक शेख (आशा टॉकीज चौक), अरबाज मुश्ताक शेख (गोविंदपुरा), परवेझ नियाज तांबोळी (रामचंद्र खुट), उबेद  अफरोज तांबोळी (रामचंद्र खुंट),अरबाज सय्यद (सुभेदार गल्ली), रईस नफीस खान (मुकुंदनगर), शादाब सादीक शेख (सुभेदार गल्ली) आणि हॉटेल मॅनेजर विशाल किशोर चव्हाण (शिवाजी नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments