रुग्णांचे पैसे परत न दिल्याने मनसेचा आंदोलनाचा इशारा

रुग्णांचे पैसे परत न दिल्याने मनसेचा आंदोलनाचा इशारा 

वेब टीम नगर : कोरोना काळातील कोरोना रुग्णांवरील वाढीव बिलाची रक्कम परत करण्याचे आदेश महानगर पालिकेने शहरातील 13 हॉस्पिटलला दिले होते  व वाढीव बिलाची रक्कम सदर रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. सदर रक्कम रुग्णांच्या खात्यावर  सात दिवसाच्या आत जमा करावी. अन्यथा महानगर पालिका कारवाई करनार असलयाचे पत्र सदर 13 हॉस्पिटल ला दिले परंतु आज पर्यंत 48 लाख रुपये एवढी मोठी रक्कम परत करण्याचे आदेश महानगर पालिकेने दिले असताना 2 महिने उलटून देखील फक्त 1 लाख 71 हजार रुपये 3 हॉस्पिटल ने परत केले असुन अजुन जवळपास 47 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे असतांना देखील खाजगी हाॅस्पिटल वाल्यांनी उपजिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली .

इतके दिवस उलटून देखील महानगर पालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसुन आल्यामुळे हॉस्पिटल चालकांना महानगर पालिकेचे आयुक्त व संबधित पदाधिकारी पाठीशी घघालतांना दिसत आहे.त्यामुळे  रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करनार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी मोठे अंदोलन महानगर पालिकेत व संबधित अधिकार्यांच्या विरोधात करण्यात येणार असुन ज्या रुग्णांची वाढीव बिलाची रक्कम परत मिळली नाही अश्या लोकांनी, नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,मनोज राऊत,शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर,ॲड अनिता दिघे , तसेच शहरातील व तालुक्यातीलसर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत राहणार आहेत असा ईशारा मनसे च्या वतीने नितीन भुतारे यांनी  या पत्रकाद्वारे महानगर पालिकेला दिला आहे.

Post a Comment

0 Comments