दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पाठलाग करून पकडले

 दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पाठलाग करून पकडले 

वेब टीम नगर :केडगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ पॆकी ३ दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्यात कोतवाली पोलिसांना यास आले आहे मात्र २ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

याबात मिळालेली माहिती अशी, केडगाव शिवारात रात्री गस्तीस असलेल्या कोतवाली पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कांदा मार्केट ते निल हॉटेल कडे येणाऱ्या रस्त्यावरील परिसरात काही संशयित दुचाकी वाहनांवरून फिरत असून ते कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. हि माहिती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक राकेश नांदगावकर यांनी व उप विभागीय पोलीस अधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून परिसरात सापळा लावण्यास सांगितले त्याप्रमाणे भौगुंडे युआनच्या टपरी जवळ सापळा लावल्यानंतर एका मोटर सायकलवर ३ इसम व दुसऱ्या मोटर सायकल वर २ इसम येताना दिसले. त्यांना टॉर्च लाईट  च्या प्रकाशनाने थांबण्यास सांगण्यात आले मात्र ते न थांबता थेथून पळून जाऊ लागल्याने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून एका मोटर सायकल वरील ३ इसमांना पकडले तर दुसऱ्या मोटर सायकलवरील २  इसम अंधाराचा फायदा घेऊन भरधाव वेगाने पळून गेले. ताब्यात घेतलेल्या ३ इसमाची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे काळ्या रंगाचे एअर पिस्टल , एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल,एक धारदार चाकू , लाल मिरची पावडर असा मुद्दे माल मिळाल्याने ते कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीने जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना जेरबंद करण्यात आले. 

ताब्यात घेण्यात आलेल्या नितीन किसान पवार, व त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून आरोपी नितीन किसान पवार याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात ३ तर नगर तालुका पोलीस  ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. हि कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर  पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, सहाय्य्क पोलीस निरिक्षक विवेक पवार , पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे , गणेश धोत्रे , शाहिद शेख, नितीन शिंदे, विष्णू भागवत, रवी टकले, पोलीस कॉन्स्टेबल भारत इंगळे, सुजय हिवाळे सुमित गवळी , तानाजी पवार , प्रमोद लहारे , सोमनाथ राऊत, योगेश कवाष्टे , कैलास  शिरसाठ,सुशील वाघेला , यांनी केली .       


Post a Comment

0 Comments