भाजपने केली वीजबिलांची होळी

 भाजपने केली वीजबिलांची होळी 

महेंद्र गंधे : सरकारमध्ये ताळमेळ नाही 

वेब टीम नगर : कोरोना टाळेबंदीच्या काळात शासनाने वारंवार वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या घुमजावामुळे राज्य सरकारला कोणतीही सवलत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जनतेची घोर फसवणूक झाली असून सरकार मधील घटक पक्षातही एकवाक्यता नसल्यानं सरकारचा भोंगळ कारभार असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केली आहे.    

राज्यभरातील वीज ग्राहकांना वाढीव बिले आली असल्याने भाजपने हा मुद्दा उचलून धरत राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन सुरु केले आहे.नागपूर , मुंबई,पुणे, अहमदनगर आदी शहरांमध्ये वीजबिलांची होळी करण्यात आली.जिल्ह्यामध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये  मोठी दहशत आहे.दिवस वीजपुरवठा नीट होत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते त्यामुळे ग्रामीण भागात वीज वितरणने दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष द्यावे. मंत्रांच्या घरांची वीजबिलं सरकार माफ करते मात्र शेतकऱयांची वीजबिलं माफ करता येत नसल्याची टीका भानुदास बेरड यांनी केली .   

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनिल रामदासी, प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर मालनताई ढोणे, मीहीला व बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, अ‍ॅड विवेक नाईक, जगन्नाथ निंबाळकर, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, महेश नामदे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, तुषार पोटे, बाळासाहेब कोतकर, अजय ढोणे, कालिंदी केसकर, रेखा मैड, संध्या पावसे, सुधा लाटे, नवनाथ टिमकर, बाळासाहेब गायकवाड, सतिश शिंदे, सुजीत खरमाळे, लक्ष्मीकांत तिवारी, चंद्रकांत पाटोळे, अ‍ॅड. चंदन बारटक्के, नरेश चव्हाण, सचिन चोरडीया, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, अविनाश साखला, मनोज ताठे, दत्ता गाडळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments