दीपावली वार्षिक भविष्य

दीपावली वार्षिक भविष्य 

मिथुन :लक्ष्याकडे वाटचाल

मिथुन राशीला हे वर्ष मध्यम फलदायी होणार आहे. उद्योगधंद्यात नोकरीमध्ये अडचणी नोव्हेंबर-डिसेंबर नंतर कमी होतील.  बरेच वर्ष मानसिक त्रास होत असेल, व्यवसायातील सहकारी नोकरदार पार्टनर चिंता वाढवणारा आहे.  भागीदारीचा व्यवहार गुणवत्ता निर्माण करणारे पुढील वर्षीच्या एप्रिल नंतर थोडे अपयश येणार  पण घाबरून जाऊ नका अडचणीतून मार्ग निघेल उत्तम लक्ष्याकडे वाटचाल होणार आहे.  नवीन वास्तू घरदार शेतीवाडी ची कामे होतील आर्थिक अडचणी कमी होऊन कमी होतील खर्च मात्र वाढतील पण काही खर्च योग्य होतील एकूण हे वर्ष सर्वसाधारण जाणार आहे तेव्हा कोणताही निर्णय विचाराने घेतला पाहिजे

उपासना :यावर्षी शनी मारुती अनेक गुरुदेव दत्तात्रयाची उपासना करावी एकादशीचा उपवास करावा विष्णुसहस्रनाम उच्चारण करावे सत्यनारायण पूजा वर्षातून एक-दोन वेळा तरी करावी

 


कर्क: निर्णय योग्य ठरतील


हे वर्ष आपल्याला यश कार्य आनंदाचे तुमच्या रेंगाळलेल्या प्रश्नास योग्य निर्णय घेण्याचे आहे.  कौटुंबिक सुख समाधान मिळवून देणार आहे . त्यासाठी दिवाळी नंतरचा काळ महत्त्वाचा ठरणार आहे . कोर्टकचेरीची कामे टाळावीत मुला मुली बरोबर मतभिन्नता वाद वाढू देऊ नका सामोपचाराने घ्यावे एकूणच काही कामे रेंगाळतील तरी त्या दृष्टीने जाणकारांचे योग्य मार्गदर्शन घ्यावे.  स्थावर मालमत्ता फायदेशीर होईल नोकरीत प्रगती राहील वाहन खर्च वाढेल प्रवास सुखकर होतील सहली तीर्थयात्रा मनाप्रमाणे होतील . एकूण नोकरी-व्यवसायात प्रगती राहील. 

उपासना : मोती अंगठीत वापरावा शिवशंकराची उपासना यावर्षी अवश्य करावी त्याचबरोबर कुलदेवी देवतांचा वर्षभर कुळाचार पाळावा दर सोमवारी उपवास करून महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे.Post a Comment

0 Comments