अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक नियुक्त

 अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे 

भरारी पथक नियुक्त 

                                                                 रघुनाथ आंबेडकर 

                                                                         संदीप रसाळ 

                                                                       विराज मुनोत 

                                                                        वैभव पवार 

                                                                     प्रशांत जठार 


                                                          प्रणिता पांडुळे-सूर्यवंशी 

      

सदस्यपदी  रघुनाथ आंबेडकर,संदीप रसाळ,विराज मुनोत,वैभव पवार यांची, तर समारंभ समितीवर प्रशांत जठार आणि महिला ब्रिगेड सदस्यपदी प्रणिता पांडुळे - सूर्यवंशी

नगर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विविध समितीवर अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुका स्तरावर निवड जाहीर झाल्या असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी संदिप  अशोक रसाळ यांची भरारी पथक-ता.अकोले , प्रशांत गणपत जठार समारंभ समिती , रघुनाथ जगन्नाथ आंबेडकर - ता.पारनेर ,वैभव अनंत पवार भरारी पथक सदस्य - अहमदनगर , प्रणिता पांडुळे - सूर्यवंशी महिला ब्रिगेड अहमदनगर , विराज विनय मुनोत भरारी पथक सदस्य- अहमदनगर  यांची निवड केली असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.श्री.नजान यांच्या शिफारशीनुसार सदर निवड झाल्या असून अ. भा.म.चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांनी मराठी चित्रपट क्षेत्राचा विकास होण्यासाठी तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक कार्य करावे असे.मेघराज राजेभोसले यांनी शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

    यावेळी शशिकांत नजान म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील नाट्य-सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्र दैदिप्यमान अशी वाटचाल करीत असून विविध वेबसिरीज, टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष ,पदाधिकारी आणि संचालक यांनी ग्रामीण भागापर्यंत महामंडळाचे कार्य पोहोचविले आहे.प्रत्येक कलाकार तंत्रज्ञ तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांना न्याय आणि संधी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समिती प्रमुख व सभासद हे कार्य अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करतील.

         वरील सर्व समिती सदस्यांची पुणे कार्यालयातून निवड जाहीर झाल्यानंतर नजान यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जेष्ठ कलाकार श्रेणीक शिंगवी,अनंत रिसे,राहुल सुराणा,युवा दिग्दर्शक स्वप्नील नजान,तंत्रज्ञ विशाल गुंड,प्रणव कटारिया,यश शर्मा, रामदास धुमाळ ,ज्योती गुंजाळ आणि स्वप्नील कुऱ्हाडे उपस्थित होते. नवनिर्वाचित विविध समिती सदस्यांचे अ. भा.म.चित्रपट महामंडळ खजिनदार  संजय ठुबे,सल्लागार, अनिल गुंजाळ,जेष्ठ अभिनेते प्रकाश घोत्रे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे


Post a Comment

0 Comments