आरोग्य आहार
सॅण्डविच इडली
साहित्य : ३ वाटी तांदूळ , १ वाटी उडीद डाळ, पाव छोटा चमचा मेथी दाणे , मटार ,सिमला मिर्ची , पत्ता कोबी , गाजर , साखर , चाट मसाला , चीज , आलं लसूण पेस्ट .
तयारी : प्रथम तांदूळ , उडीद डाळ , मेथी दाणे ७-८ तासांसाठी भिजत घालणे. त्या नंतर तांदूळ उडीद डाळ मेथी दाणे मिक्सरवर वेगवेगळे रवाळ वाटून घेणे . दोन्ही पीठे एकत्र करून मीठ घालून ७-८ तासांसाठी झाकून ठेवणे.
मटार वाफवून घेणे, सिमला मिर्ची बारीक चिरून घेणे , कोबी व गाजर , किसून घेणे , चीज किसून घेणे आलं लसूण पेस्ट करून घेणे .
कृती: प्रथम कढईत तेल घालून फोडणी करणे , त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून सर्व भाज्या टाकून वाफवून घेणे. २ वाफ आल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला , तिखट, मीठ , साखर घालून १ वाफ आणणे. तयार झालेल्या भाजी मध्ये चीज किसून टाकणे व भाजी गार करण्यास ठेवणे .
त्यानंतर इडली पात्रास तेल लावून घेणे प्रथम २ चमचे इडलीचे पीठ पात्रात टाकणे त्यावर १ चमचा भाजी टाकणे आणि नंतर त्यावर पुन्हा २ चमचे इडलीचे पीठ टाकणे व इडली वाफवून घेणे. गार झाल्यावर ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करणे.
अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५
* Dietitian and Nutritionist
* B.Sc in Food Science and Nutrition
* Diploma in Nutrition and Health Education
* Diploma in Yog Shikshak
0 Comments