वासन टोयोटात नवीन अर्बन क्रूजरचे अनावरण

 वासन टोयोटात नवीन अर्बन क्रूजरचे अनावरण

वेब टीम नगर - टोयोटा किर्लोस्कर मोटरची बहुप्रतीक्षित अर्बन क्रूजर कॉम्पॅक्ट एसयूव्ही नुकतीच बाजारपेठेत दाखल झाली आहे. शहरातील केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये नवीन अर्बन क्रूजरचे आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, अनिश आहुजा, दिपक जोशी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुमतीलाल कोठारी, महेंद्र छाजेड, रविंद्र थोरात, प्रविण जोशी आदी उपस्थित होते.

वासन ग्रुपचे चेअरमन विजय वासन व तरुण वासन यांनी दसर्‍याचे सर्व ग्राहक वर्गाला शुभेच्छा दिल्या. दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर टोयोटाच्या सर्व चारचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. टाळेबंदी काळानंतर ग्राहक वर्ग चारचाकीकडे आकर्षित होत असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.

अर्बन क्रूजर कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीनतम फिचर्स, प्रबल १.५ लीटर पेट्रोल इंजिनने सुसज्ज असून, ग्राहकांना ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट अनुभव घेता येईल. अर्बन क्रूजर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. ग्राहकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी टोयोटा अर्बन क्रूजर टोयोटाच्या प्रख्यात अनुभवासह सुसज्ज आहे. यामध्ये ३ वर्ष १ लाख किलोमीटर, ईएम ६० ची एक्स्प्रेस सर्विस, वॉरंटी एक्सटेंशनसह टी कनेक्ट ( टोयोटा कनेक्ट) या अ‍ॅप्लीकेशनद्वारे कम्युनिकेशन सारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. टोयोटा अर्बन क्रूजरची किंमत ८ लाख ४० हजार पासून सुरू होऊन ११ लाख ३० हजार पर्यंत जाते. भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही स्वरुपातील इतर स्पर्धात्मक कारच्या तुलनेत उत्कृष्टरित्या सज्ज आहे. टोयोटा अर्बन क्रूजर ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हसाठी नगर-पुणे रोड, केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे. 

Post a Comment

0 Comments