निर्भया प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय





दोषी मुकेशला फाशीच 
 निर्भया प्रकरण : उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
वेब टीम नवी  दिल्ली,दि . २९- सर्वोच्च न्यायालयाने आज  निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका फेटाळली आहे. या अगोदर राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ठेवतं  मुकेशने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची याचिका फेटाळल्याने आता मुकेशला फाशी निश्चित आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले, राष्ट्रपतींच्या निर्णयात कोणतीही घाई वाटत नाही. त्यांनी सर्व कागदपत्र तपासूनच निर्णय दिला आहे. म्हणूनच यामध्ये दखल देण्याची आवश्यकता वाटत नाही. कारागृहात मुकेशला चुकीची वागणूक मिळाली हा काही त्याला दयेचा आधार होऊ शकत नाही. दया याचिकेवर तातडीने निर्णय दिला म्हणजे असं होत नाही की निर्णय योग्यरित्या घेतला गेलेला नाही.

Post a Comment

0 Comments