ट्रम्प दांपत्यात कटुता, मेलानियांचा पतीवर अविश्वास


एलिझाबेथ एगन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच चर्चेत असतात. पण या वेळी पत्नी मेलानिया ट्रम्पमुळे ते चर्चेत आहेत. अमेरिकेच्या प्रथम असलेल्या मेलानिया यांच्यावर ‘फ्री मेलेनिया- द अनअथॉराइज्ड बायोग्राफी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुस्तकातील काही गोष्टींमुळे खळबळ उडाली आहे. मेलानिया यांचे त्यांचे पती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बिनसले असल्याचा दावा या पुस्तकात केलेला आहे. मागील काही काळात आलेल्या छायाचित्रांमधूनही हे निदर्शनास आलेले आहे. कॅट ब्रेटन या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी दीर्घकाळ व्हाइट हाऊसचे वार्तांकन केलेे आहे. मेलानियांंच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
पॉवरफुल लेडी :
मेलानिया यांचा पतीवर चांगलाच पगडा आहे. मागील वर्षी, अाफ्रिका दौऱ्यावेळी मेलानिया यांच्या सहकाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याने ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मीरा रिकार्डेल यांना पदावरून काढले होते. ट्रम्प यांच्या राजकीय, प्रशासनासंबंधी निर्णयांवर मेलानियांचा प्रभाव असतो. ट्रम्प यांच्यासोबत अनेक वेळा संवाद साधतात.
इव्हांकासोबतचे नाते :
सध्या व्हाइट हाऊसमध्ये मेलानिया आणि इव्हांका या दोन प्रथम महिला नागरिक असल्याचे मानले जात आहे. इव्हांका या ट्रम्प यांच्या प्रत्येक दौऱ्यात सहभागी असतात. मेलानिया आणि इव्हांका दोघीही आपल्यामध्ये सर्वकाही चांगले असल्याचे दर्शवतात. मात्र त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरून खटके उडतात.
वेगवेगळ्या बेडरूम :
व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि मेलानियांच्या वेगवेगळ्या बेडरूम आहेत. पती-पत्नी दोघेही वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात. मेलानियांची तिसऱ्या मजल्यावर आलिशान खोली आहे. त्या अनेकदा असे कपडे घालतात, जे औचित्याला शोभणारे नसतात.
दोघांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे जाहीरपणेही उघड
ट्रम्प आणि मेलानिया यांच्या सार्वजनिक पातळीवरील वर्तणुकीमुळे त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे लोकांना वाटते. मेलानिया सार्वजनिक स्तरावर क्वचितच ट्रम्प यांच्यासोबत हस्तांदोलन करतात. ट्रम्प आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, या विचाराने त्या नेहमी चिंतेत दिसतात.

Post a Comment

0 Comments