राजकीय क्षेत्रात काम करतांना सामाजिक बांधिलकी पाळावी - शरद मरकड
पद्मशाली समाजाचे वतीने तेलंगणा राज्याचे स्वीय सहाय्यक शरद मरकड यांचा सन्मान
नगर -तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता मा. चंद्रशेखरराव यांचे स्वीय सहाय्यक शरदजी मरकड यांचा अहिल्यानगर पद्मशाली समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला .यावेळी शरदजी मरकड यांनी तेलंगणा राज्याचे कार्या बाबत माहिती देऊन तेलंगणा राज्यामध्ये मा. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री असताना जे काम केले ते काम संपूर्ण भारतात इतर कोणत्याही राज्यात झालेले नसुन आज सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून चंद्रशेखर राव यांचे कार्य तेलंगणामध्ये कौतुकास्पद आहे.
अहिल्यानगर मध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात असून पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचे मार्कंडेय मंदिराचे जिर्णोधाराचे काम सुरू असून त्यासाठी तेलंगणा राज्याच्या वतीने व मा. मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या वतीने मोठे आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करु , तसेच अहिल्यानगर मधील पद्मशाली समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनेच्या माध्यमातून सहकार्य करु असे आश्वासन शरदजी मरकड यांनी दिले .
पद्मशाली पंच कमिटी न्याती समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व श्री मार्कंडे देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये यांच्या हस्ते शरद मरकड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी पद्मशाली समाजाचे विश्वस्त विनोद बोगा, तिरमलेश पासकंटी, पुरुषोत्तम सब्बन ,सुनील नेटके ,हिंमत पडोळे, शिवाजी काकडे आदी उपस्थित होते .
यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी अहिल्यानगर मधील पद्मशाली समाजाचे कार्या बाबत माहिती देऊन समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी मंदिराचे जिर्णोधाराचे काम चालू असून लवकरच या कामाला गती मिळावी याकरिता सरकारी मदत मिळणे कामी प्रशासनाकडे प्रयत्न चालू आहेत, तसेच समाजातील वंचित घटकांसाठी योग्य ते कार्य विश्वस्तांच्या वतीने करीत असल्याची माहिती दिली. या वेळी स्वीय सहाय्यक शरदजी मरकड यांनी हैद्राबाद येथे येण्याचे आमंत्रण दिले. पाहुण्यांचे स्वागत श्री गणेश विद्दे यांनी केले, तर आभार विनोद बोगा यांनी मानले.

.jpg)
0 Comments